फोटो - नांदगाव खंडेश्वर १२ पी
नांदगाव खंडेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक जोमात दिसत असताना गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली. सोयाबीनचे पीक फुलोरा अवस्थेत असून त्यास कळी धरणेचा कालावधी सुरू झाला आहे. अशा अवस्थेत पावसाचा खंड सोयाबीन उत्पादनावर परिणाम करू शकतो, ही भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
सोयाबीन पिकात अन्नद्रव्य शोषून घेणाऱ्या बारीक मुळ्याचे जाळावरच जमिनीत तयार झालेली असतात. पावसाच्या खंडामुळे जमिनीला भेगा पडल्या, तर त्या तुटण्याची भीती असते. पिकाला अन्नद्रव्य कमी प्रमाणात मिळाल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. कपाशीचे पीक पाती, फुले व बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत असल्याने पावसाच्या खंडामुळे पातींची गळ सुरू होण्याचा धोका निर्माण झाला आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. तालुक्यात ४९ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा आहे. ६ हजार १७० हेक्टर क्षेत्रात कपाशीचे पीक, ९ हजार २२६ हेक्टर क्षेत्रात तूर, ४२८ हेक्टर क्षेत्रात मूग व ३५६ हेक्टर क्षेत्रात उडीद पिकाचा पेरा आहे.
---------------------
हलक्या जमिनीतील सोयाबीन पावसाच्या खंडामुळे उन्हात सुकल्यागत होत आहे. फुले गळण्याची शक्यता निर्माण झाल्याने उत्पादनात घट होणार आहे.
- राजेंद्र सरोदे, शेतकरी, माहुली चोर
----------
खरबी गुंड शिवारात व आजूबाजूच्या परिसरात सुमारे तीन आठवड्यांपासून पावसाचा खंड आहे. फुल व कळी अवस्थेत असलेले सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.
- जीविता विनोद जगताप, सरपंच, वाघोडा
---------------
कोठोडा शिवारात गेल्या बारा दिवसांपेक्षाही जास्त पावसाचा खंड असल्याने फुलोर अवस्थेत असलेले सोयाबीनचे पीक धोक्यात आले. उत्पादनात घट होण्याची भीती आहे.
- नितीन इंगोले, शेतकरी, कोठोडा
---------------
दोन-चार दिवसांत पाऊस आला नाही, तर सोयाबीनचे फुल गळ होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
- सूरज ठाकरे, शेतकरी, पहूर
पद्माकर भेंडे, शेतकरी पहुर.)
120821\img20210812113703.jpg
पावसाचा खंड, पिके धोक्यात.