बारगाव जंगलातील घटना : लाखोंची वनसंपदा नष्ट वरूड: तालुक्यातील मोर्शी वन परिक्षेत्रातील बारगाव परिसरात विद्युत रोहित्राच्या ठिणगीमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. यात सुमारे ११ हेक्टर वनक्षेत्र जळाले. प्राप्त माहितीनुसार, वरुड तालुक्यातील बारगाव वनपरिसर मोर्शी वनपरिक्षेत्रातील गोरगाव बिटमध्ये समाविष्ट आहे. रविवारी दुपारी १२.३० वाजता वीज रोहित्रातून पडलेल्या ठिणगीतून आग लागली. उन्हामुळे आग वाढत गेली. यात ११ हेक्टर जंगल खाक झाले. यात वनविभागाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच वरूड नगरपरिषद व मोर्शी नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील आगीला नियंत्रणात आणण्यासाठी बराच वेळ अग्नीशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. वेळीच माहिती मिळाल्याने मोठा परिसर जळण्यापासून बचावला असल्याचे मानले जात आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासासाठी बेनोडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शांतीकुमार पाटील, उपनिरीक्षक भारत लसवंते यांच्यासह पोलीस पथकाने आग आटोक्यात आणली. आगीच्या कारणांचामिंमास झालेल्या नुकसानीचा आढवा घेण्यात येईल.
रोहित्रामधून उडाली ठिणगी ११ हेक्टर क्षेत्र जळून खाक
By admin | Published: April 17, 2017 12:12 AM