शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

शेतकऱ्यांमधून व्हावा सभापती

By admin | Published: February 20, 2017 12:08 AM

सहकारात प्रस्थापितांऐवजी शेतकरी प्रतिनिधी यावेत, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे.

बाजार समितीसाठी तज्ज्ञांची सूचना : समितीची पुण्यात बैठकअमरावती : सहकारात प्रस्थापितांऐवजी शेतकरी प्रतिनिधी यावेत, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे. बाजार समितीतदेखील सर्व शेतकऱ्यांना मताधिकार असावा, यासाठी शासनाने समिती गठित केली आहे. या समितीची १८ फेब्रुवारीला पहिली बैठक पुण्यात झाली. यामध्ये थेट शेतकऱ्यांमधून बाजार समिती सभापतीची निवड व्हावी, अशी सूचना शासन नियुक्त तज्ज्ञ संचालक विजय हाडोळे यांनी समितीस केली आहे. नगर विकास विभागाने केलेल्या सुधारणेनुसार नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांमधून केली आहे. त्याच धर्तीवर थेट शेतकऱ्यांमधून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती पाच वर्षांसाठी निवडले जावेत, या प्रस्तावाचा विचार करण्यात यावा, अशी सूचना हाडोळे यांनी पणन संचालकांनी आयोजित केलेल्या पहिल्या बैठकीत केली आहे. कृषी मालाच्या विपणनात बाजार समित्यांची भूमिका ही समित्यांना बळकटी देण्यासाठी महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांना विपणनासाठी पर्यायी बाजारपेठ उपलब्ध करणे, या बाबी रास्त आहेत. मात्र यासाठी बाजार समित्यांचा कायदाच रद्द केल्यास शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखे होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. बाजार समितीच्या घटनेनुसार शेतकऱ्यांना १५ प्रतिनिधी निवडावे लागतात. पूर्वी बाजार क्षेत्रातील शेतकऱ्यास संचालक पदाकरिता निवडणूक लढविता येत होती. मात्र मतदान हे सोसायटींचे पंचकमेटी सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्यांना करता येत होते. यामध्ये बदल होऊन मतदार यादीत ज्यांचे नाव आहे किंवा तो ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांनाच निवडणूक लढविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे.बाजार समितीत नवीन दुरुस्तीप्रमाणे पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी बाजारपेठा स्थापन होत आहे. येथे माल विक्रीचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. या बाजारपेठांना बाजार समिती सारखेच अधिकार आहेत. नियंत्रण मात्र खासगी आहे. येथे शेतकऱ्यांना त्यांची तक्रार करण्यास वाव राहत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी अ‍ॅडव्हायरसी कमेटी स्थापन करण्याविषयी विचार झाल्यास सोईचे होणार आहे. आदींच्या प्रस्तावित बदलामुळे सहकार समृद्ध होऊन प्रस्थापितांच्या बेलगाम कारभाराला खिळ बसणार आहे व शेतकऱ्यांचे नेतृत्व बाजार समितीत उदयाला येणार आहे. (प्रतिनिधी)निवडणूक वैधतेला आव्हान दिल्यास अधिकार कुणाकडे ?बाजार समिती नियमनानुसार सर्व जबाबदारी ही महसूल विभागातील जिल्हाधिकारी व सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधकावर आहे. मात्र सध्याचे स्वरुप पाहता ही निवडणूक आयोगाने घेतल्यास सोईची होईल. विशेषत: नियम ८८ बाबत निवडणुकीची वैधता आव्हानित झाल्यास अधिकार कुणाकडे असेल याविषयीची शंका सुचनेत व्यक्त करण्यात आली.संचालकपद रिक्त झाल्यास पोटनिवडणूक घ्यावीबाजार समितीचे कलम १८ अन्वये बाजार समितीत रिक्त झालेले दोन संचालकपदांची स्वीकृत नियुक्ती करण्याचे अधिकार समित्यांना आहेत. मात्र नव्याने जर नियमनात बदल होत आहेत, तर यामध्ये सुधारणा करण्यात येऊन ही रिक्त पदे निवडणुकीद्वारा भरली जाणे महत्त्वाचे आहे व विधान परिषद निवडणुकीत संचालकांना मताधिकार असणे महत्त्वाचे आहे.