शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

कुपोषण निर्मूलनासाठी विशेष मोहिम नव्या जिल्हाधिकाऱ्यांचा अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:11 AM

पवनित कौर यांनी पदभार स्विकारला;पारदर्शकता व गतिमान प्रशासनावरही भर अमरावती ; मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य व पोषण ...

पवनित कौर यांनी पदभार स्विकारला;पारदर्शकता व गतिमान प्रशासनावरही भर

अमरावती ; मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य व पोषण योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात येईल. त्याचप्रमाणे, वैद्यकीय सुविधा उपलब्धता करून देत असतानाच तेथील स्थानिकांनी इतर अंधश्रद्धा आदी बाबींना बळी पडू नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या हेतूने व्यापक जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहिम हाती घेऊ. जव्हारमध्ये यापूर्वी असा कार्यक्रम राबविण्यात आला होता.तोच कित्ता मेळघाटात कृषोषण निर्मूलनासाठी विशेष मोहीमेव्दारे राबविण्यास आपली प्राथमिकता असून पारदर्शकता व गतिमान प्रशासनावर भर राहणार असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी गुरूवारी येथे दिली.अमरावतीच्या नव्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आपल्या पदाचा कार्यभार यापूर्वीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून १५ जुलै रोजी स्वीकारला. पवनित कौर या मूळ पंजाबमधील आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०१४ मध्ये आयएएस सेवेत निवड झाल्यावर त्यांची प्रथम नियुक्ती पालघर जिल्ह्यात जव्हार येथे प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच पुणे येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त, महिला व बालविकास आयुक्त म्हणूनही काम पाहिले. अमरावती येथील जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर त्यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधला.जिल्ह्यात पांदणरस्ते योजनेच्या अंमलबजावणीला पूर्व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गती दिली. हा कार्यक्रम यापुढेही भरीवपणे राबविणार. जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्यांबाबत निर्णय व अंमलबजावणीसाठी लवकरच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध विभागप्रमुख आदींच्या बैठका घेण्यात येतील, त्याचप्रमाणे, जिल्ह्यात आवश्यक त्या सर्व ठिकाणी पुढील आठवड्यात भेटी देऊ, असेही जिल्हाधिका-यांनी यावेळी स्पष्ट केले.

बॉक्स

लसीकरण मोहीम सुरळीत राबविणार

सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे. तथापि, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात येतील. विशेषकरून, लसीच्या पुरवठ्याअभावी लसीकरण मोहिमेत खंड पडू नये यासाठी दक्षतापूर्वक नियोजन करण्यात येत आहे. ४५ वर्षावरील व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील पुनर्वसनाबाबतचे प्रश्न व अडचणी सोडविण्यावरही प्राधान्याने भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बॉक्स

कुपोषण निर्मूलनासाठी विशेष मोहिम

मेळघाटात कुपोषण निर्मूलनासाठी आरोग्य व पोषण योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात येईल. त्याचप्रमाणे, वैद्यकीय सुविधा उपलब्धता करून देत असतानाच तेथील स्थानिकांनी इतर अंधश्रद्धा आदी बाबींना बळी पडू नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या हेतूने व्यापक जनजागृतीसाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोहिम हाती घेऊ. जव्हारमध्ये यापूर्वी असा कार्यक्रम राबविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.