लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती:अमरावती लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही राज्यात लक्षणीय ठरली. माजी कें द्रीय अर्थराज्यमंत्री तथा चारवेळा खासदार असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करणाऱ्या नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न : मोदी लाट कायम असताना तुमच्या विजयाचे सूत्र काय ?उत्तर : अमरावती जिल्ह्यातील मतदारांना लोकसभेत बदल अपेक्षित होता. तसेही मी गेल्या नऊ वर्षांपासून मतदारांच्या सतत संपर्कात आहे. विजयी झाली तर जनतेचे प्रश्न, समस्या सोडविणार, असा शब्द दिला आहे, तो मी पूर्ण करणारच. शरद पवार आणि मतदारांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावणारच. विरोधकांनी सुद्धा प्रत्यक्ष- अप्रत्यपणे निवडणुकीत सहकार्य केले आहे. ही बाब सुद्धा विजयासाठी पूरक ठरली.
निवडणूक चिन्ह बदलल्याने काही फरक पडला?लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी टीव्ही चिन्हावर निवडणूक लढणार, असे स्पष्ट होते. मात्र, निवडणूक म्हटले की राजकारण आले. त्यानुसार विरोधकांनी खेळी खेळली. टीव्हीऐवजी पाना चिन्ह मिळाले. यात फारसा फरक पडला नाही. परंतु, काही दिवसातच घराघरात पाना पोहचला. निकाल सुद्धा माझ्याच बाजुने लागला. त्यामुळे देव बरोबर करते, असे म्हणावे लागेल.आनंदराव अडसूळ यांच्याशी आता राजकीय वैर संपले का?मी राजकारणाला फार महत्व देत नाही. खरे तर समाजकारण हेच माझे प्राधान्य आहे. त्यामुळे मातब्बर असलेल्या आनंदराव अडसुळांचा मतदारांच्या साक्षीने पराभव झाला. अडसूळ हे माझे वडिलधारी समान आहे. त्यांचे चरणस्पर्श करुन मी आशीर्वाद घेईल. त्यांच्या मार्गदर्शनात विकासकामे मार्गी लावेल. ती मोठी व्यक्ती असून, माझ्यासाठी परमआदरणीय असतील. त्यामुळे त्यांच्याशी राजकीय वैर येण्याचा प्रश्नच नाही.रिंगणात २० अपक्ष उमेदवारांमुळे मतविभाजन झाले काय?विरोधकांनी २० अपक्ष उमेदवार रिंगणात उभे करुन मतविभाजनाची खेळी केली. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाइं (गवई गट) हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. प्रकाश आंबेडकर यांचे आशीर्वाद मिळाले. युवा स्वाभीमान पार्टीचे जाळे होते. मतदारांनी योग्य तो निर्णय घेतला आणि अपक्ष उमेदवारांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मतविभाजन टळले.निवडणूक काळात दिलेले आश्वासन कसे पूर्ण करणार?निवडणूक काळात प्रचारादरम्यान दिलेले आश्वासन आजही मला ज्ञात आहे. जिल्हा, तालुका, गावांमध्ये कोणते प्रश्न, समस्या आणि विकासकामे करायची आहे, ते मी पूर्ण करणारच. मतदारांनी टाकलेला विश्वास विकासकामातून सिद्ध करेन.जिल्ह्यात कोणत्या विकासकामांना प्राधान्य दिले जाईल?बेलोरा विमानतळ, चिखलदरा पर्यटनाचाविकास, बडनेरा येथील वॅगन दुरूस्ती कारखाना लवकरच पूर्ण करून रोजगाराची निर्मिती केली जाईल. शरद पवार, रवि राणांच्या मार्गदर्शनात ती पूर्ण होतील.