लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोणीचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांना गोंदिया जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना व त्यांनी बजावलेल्या खडतर व कठीण सेवेबद्दल पोलीस महासंचालकांच्या आदेशाने विशेष सेवा पदक मंजूर झाले आहे.गोंदिया जिल्ह्यातील नक्षली व खडतर भागात विशेष कामगिरीबद्द्ल नागेशकुमार चतरकर यांना महाराष्ट्र सरकारच्यावतीने विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले. २६ जानेवारीला जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या उपस्थितीत विशेष सेवा पदक त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. सन २०११ ते २०१४ दरम्यान ज्यांची नियुक्ती गोंदिया जिल्हा व नक्षली भागात होती, गोंदिया जिल्ह्यात तालुक्यांतील नक्षली कारवाया रोखण्यात त्यांनी यश मिळविले होते. नक्षली भागातील विविध गुन्ह्यांची उकल त्यांनी केली होती. विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे.झळके अन् चतरकर!नागेश चतरकर हे गोंदिया जिल्ह्यातील नक्षली भागात सेवा देत असताना तेथील पोलीस अधीक्षक दिलीप झळके होते. आज विशेष सेवा पदकदेखील अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्याच हस्ते स्वीकारण्याचा हा महत्त्वपूर्ण योग असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
लोणीच्या ठाणेदारांना विशेष सेवापदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:22 PM
लोणीचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांना गोंदिया जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना व त्यांनी बजावलेल्या खडतर व कठीण सेवेबद्दल पोलीस महासंचालकांच्या आदेशाने विशेष सेवा पदक मंजूर झाले आहे.
ठळक मुद्देनक्षली कारवाया रोखण्यात ठरले यशस्वी