लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रखडलेल्या रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बन्सोड यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आयुक्तांनी आढावा बैठक घेऊन घरकुलाचे बांधकाम सक्तीने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. शनिवारी आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत रमाई आवास योजनेचा आढावा घेण्यात आला. बैठकीला स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, प्रकाश बनसोड व सुनील काळे यांच्यासह उपमहापौरही उपस्थित होत्या.शासनाकडून सन २०१०-११ करिता एकूण २९३ घरकुलाचे उद्दिष्ट होते. त्याप्रमाणे संपूर्ण घरकुलांना धनादेश वाटप करण्यात आले असून घरकुले पूर्ण करण्यात आलेली आहेत. सन २०११-१२ करिता ७० घरकुलाचे उद्दिष्ट होते. ते घरकुले पूर्ण करण्यात आलेली आहेत. सन २०१२-१३ करिता एकूण ३५० घरकुलाचे उद्दिषञट होते. त्यापैकी ३३३ घरकुलांचे बांधकामे पूर्ण करण्यात आलेत. १७ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. सन २०१३-१४ करिता १३४७ उद्दिष्ट मंजूर करण्यात आले होते. मनपाकडून १५०७ घरकूल मंजूर करण्यात आले असून १३८० घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून १२७ प्रगतीपथावर आहेत. सन २०१५-१६ करिता एकूण ७०० घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर झालेले असून मनपामार्फत ७७० घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून ७७० घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. ७७० घरकुलांना पहिला टप्पा वाटप करण्यात आले असून ४० घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे व ७३० घरकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली.शासनाकडून मंजूर उद्दिष्टाप्रमाणे २९९० पैकी मनपामार्फत २४४१ लाभार्थ्यांचे घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आलेली आहेत व उर्वरीत ५४९ घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. ८०० लाभार्थ्यांचे घरकुलकरिता अर्ज प्राप्त असून बायोमेट्रीक सर्वे पूर्ण करण्यात आलेले आहे. १५०० घरकुलाकरिता ३० कोटीची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने २६ एप्रिल १७ रोजी नवीन शासन निर्णयाप्रमाणे प्रति लाभार्थी २.५० लक्ष प्रमाणे ३७.५० कोटी रुपये प्राप्त झालेली आहे.ज्या घरकुलाचे काम पूर्ण झाले असेल अश्या सर्व लाभार्थ्यांना त्वरीत निधीचे वाटप करावे. ज्या लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम पूर्ण केले नसेल त्यांना एक महिन्याचा अवधी देऊन ते काम पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्या. काम पूर्ण न केल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करावी. या योजनेकरिता शासनाकडून निधी प्राप्त झाला असून तो लाभार्थ्यांना त्वरित वितरण करणे आवश्यक आहे. जे लाभार्थी शासनाच्या निधीचे उल्लंघन करत असेल अश्या लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी प्रस्तावित करावे, अशी सूचना आयुक्तांनी केली. लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करण्यासाठी सक्ती करा, दिलेले उद्दिष्ट त्वरीत पूर्ण करावे अन्यथा कार्यवाही करण्यात येईल. शहरातील रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचा अधिकार हा मिळालाच पाहिजे. ज्या नागरिकांनी या योजनेसाठी अर्ज केला असेल व ते पात्र झाले असेल अशा लाभार्थ्यांना त्वरित निधी देण्याची सूचना आयुक्तांनी दिली.
रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 11:17 PM
रखडलेल्या रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश बन्सोड यांनी पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देमहापालिकेत बैठक : प्रकाश बन्सोड यांचा पुढाकार