शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
2
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
3
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
4
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
5
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
6
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
7
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
8
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
9
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
10
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
11
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
12
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
13
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
14
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
15
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
16
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
17
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
18
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
19
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी

बाजार समितीत प्रचाराला वेग

By admin | Published: September 08, 2015 12:19 AM

जिल्ह्यात सर्वात मोठी असलेली अमरावती, भातकुली बाजार समितीची निवडणूक येत्या १५ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे.

तीन पॅनेलमध्ये चुरस : राजकारण बाजूला ठेवून नेते एकत्रअमरावती : जिल्ह्यात सर्वात मोठी असलेली अमरावती, भातकुली बाजार समितीची निवडणूक येत्या १५ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीत पक्षीय राजकारण बाजुला ठेवून स्थानिक नेत्यांनी बाजार समिती डोळ्यासमोर ठेवून मनोमिलन केले आहे. एरव्ही एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आता प्रचारात एकत्र फिरु लागले आहेत. गटातील समर्थक कसे निवडून येतील, यासाठी निवडणुकीत प्रचाराला वेग आल्याचे चित्र आहे.बाजार समितीची निवडणूक ही सहकार क्षेत्रासाठी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. हल्लीच्या राजकारणात सहकार क्षेत्रातून आलेल्यांनी मोठी झेप घेतली आहे. १८ संचालक निवडीसाठी नेत्यांचे अस्तित्व पणाला लागले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत असलेल्या तीन पॅनेलपैकी सहकार पॅनेलचे नेतृत्व आ. यशोमती ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके तर विलास महल्ले, हरिभाऊ मोहोड हे करीत आहे. परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व माजी आ. संजय बंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, रिपाइंचे नेते राजेंद्र गवई, मनोज देशमुख, सुनील वऱ्हाडे हे करीत आहेत. तसेच शेतकरी एकता पॅनेलने तिसरी आघाडी तयार करून या निवडणुकीत रंगत आणली आहे. या पॅनलचे नेतृत्व आ. रवी राणा, माजी खा. अनंत गुढे, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, संयोगिता निंबाळकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे हे करीत आहे. या नेत्यांनी पॅनेलचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी सोसायट्या, खरेदी विक्री केंद्रे, ग्रामपंचायती, पंचायत समित्या व बाजार समित्या काबीज करण्यासाठी फार पूर्वीपासून जोरदार तयारी चालविल्याचे दिसून येत आहे. बाजार समिती निवडणुकीला उणेपुरे आठ दिवस शिल्लक असताना नेत्यांनी आपल्या गटातील संचालक कसे निवडून येतील, यासाठी राजकीय अनुभव वापरत आहे. पॅनेलनुसार नेते प्रचाराला एकत्र फिरताना आपल्या गटातील व्यक्ती कसा निवडून येईल, याचे सूक्ष्म नियोजन करीत आहे. ऐरवी एकमेकांविरुद्ध आरोपाच्या फैरी झाडणारे नेते आता बाजार समिती निवडणुकीत हेवेदावे बाजुला ठेवून एकत्र फिरु लागले आहेत. बाजार समितीत पक्षीय राजकारण नसल्याचे प्रचारादरम्यान ठामपणे सांगण्याचा प्रयत्न हे नेते करीत असले तरी सहकार क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्यासाठी ते कोणतीही संधी सोडताना दिसून येत नाही, हे विशेष.