शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

जलयुक्त शिवाराच्या कामाची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2017 12:21 AM

तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानामध्ये यावर्षी नव्याने १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

कामांना सुरुवात : १५ गावांचा नव्याने समावेश लोकमत न्यूज नेटवर्क चांदूरबाजार : तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानामध्ये यावर्षी नव्याने १५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. याच योजनेंतर्गत १९ बंधारे व तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मागील वर्षी जलयुक्त शिवाराचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. पण यावर्षी कामाची गती मंदावली असल्याचे चित्र दिसून येत आहे. यावर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जावरा, उदापूर, पाळा, ब्राम्हणवाडा थडी, चिंचोली ब्राम्हणवाडा, बेलखेडा, गणोजा, आसेगाव पूर्णा, गोविंदपूर, जगन्नाथपूर, हिरुळपूर्णा, कोंडवर्धा, मौजखेडा, मासोद, शहापूर या गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सिंचन क्षेत्रात वाढ करून शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी, यासाठी तलावातील गाळ काढणे व तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविणे, पाणी अडविणे व पाणी जिरविणे यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा योजनेचा उद्देश आहे. यासाठी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करणे, गावतलाव, साठवण तलाव, शिवकालीन तलाव, ब्रिटिशकालीन तलाव, निजामशाही तलाव, माती नाला बंधाऱ्यातील गाळ काढणे, जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यातील गाळ काढणे, नाला जोड प्रकल्प राबविणे, विहिरीचे बोअरवेलचे पुनर्भरण करणे, मोकळ्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करणे, शिवारातील पाण्याचा शिवाय नियोजन करणे यासाठी जि. प. च्या लघुसिंचन विभाग, पाटबंधारे विभागाकडेही याची जबाबदारी देण्यात आली आहे.