शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

भरधाव कारची ऑटोला धडक; सात जखमी; बिझिलँडजवळील घटना

By प्रदीप भाकरे | Published: November 16, 2022 5:07 PM

या धडकेत ऑटो दोनदा उलटला

अमरावती : नागपूरहून भरधाव येणाऱ्या कारने ऑटोला धडक दिल्याने ऑटोमधील सहा प्रवाशांसह ऑटोचालक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास बिझिलँड प्रवेशद्वारासमोर घडली. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अकोला येथील गेडाम परिवारातील सदस्य कापड खरेदी करण्यासाठी अमरावतीहून ऑटो (एम.एच.२७,पी.५७३३) ने बिझिलँड येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान ऑटो चालक महामार्गावरून वळण घेत असतांना नागपूरकडून येणाऱ्या भरधाव कारने (एम.एच.४०ए.सी २८८२) ऑटोला धडक दिली. या धडकेमुळे ऑटो दोनदा उलटला.

यामध्ये नितीन वाघमारे (३६, अकोला), राहुल फुलझेले (३५, वाळकी जि. यवतमाळ), शैलेश गेडाम (३४, अकोला),चैताली गेडाम (३२, अकोला), सुरेखा गेडाम (६०, अकोला),बापूराव कोकाटे (५५, इर्विन वसाहत अमरावती), नरेश नितनवरे (४८, बेलपुरा, अमरावती) हे सातजण जखमी झाले. 

माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळावर तातडीने धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकाद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरोपी कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास नांदगाव पेठचे ठाणेदार प्रवीण काळे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती