शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

‘केम’द्वारे २० दिवसांत ३२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 10:48 PM

पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी राबविला जाणाऱ्या कृषिसमृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाने (केम) २० दिवसांत ३२.४० कोटी रुपये निधी खर्च केला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे सहा जिल्ह्यांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना रोजगाराची साधने आणि विविध विकासकामे होतील, असा दावा ‘केम’ने केला आहे.

ठळक मुद्देआचारसंहितेपूर्वीच निविदा प्रक्रिया : पश्चिम विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये विकासकामे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी राबविला जाणाऱ्या कृषिसमृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाने (केम) २० दिवसांत ३२.४० कोटी रुपये निधी खर्च केला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे सहा जिल्ह्यांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना रोजगाराची साधने आणि विविध विकासकामे होतील, असा दावा ‘केम’ने केला आहे.कृषिसमृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प १३ आॅगस्ट २००९ ला आला. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये शासनामार्फत आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी) व सर रतन टाटा ट्रस्ट (एसआरटीटी) यांच्या वित्तीय सहयोगाने हा प्रकल्प सुरू आहे. ‘केम’ प्रकल्पाकडे असलेली उर्वरित कामे पूर्ण करणे, प्रकल्प समाप्तीबाबत व प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा ३१ मार्च २०१९ च्या पुढे सुरू ठेवण्यास तसेच प्रकल्पाकडील सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वितरित निधीपैकी ३२.४० कोटी एवढी रक्कम ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा निर्णय १६ फेब्रुवारी २०१९ रोजी घेतला. या ३२.४० कोटींमधून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून देणे आणि शेतीपूरक व्यवसाय उभारणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक बळ आणि रोजगार उपलब्ध करण्यासाठी साकारण्यात आला आहे. यापूर्वी ‘केम’ प्रकल्पात अनियिमितता झाल्याप्रकरणी शासनस्तरावर चौकशी सुरू आहे. महत्प्रयासाने या प्रकल्पाला यंदा मुदतवाढ देण्यात आली आहे.बंधारे, शेततळे, नाले खोलीकरणाला प्राधान्य‘केम’ प्रकल्पाला शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोजगाराची साधने, शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग उभारणीसाठी आर्थिक मदत आदी रोजगाराशी निगडित बाबींवर ३२.४० कोटी रुपयांचा निधी खर्च होणे आवश्यक होते. मात्र, हा निधी सिंचन, बंधारे निर्मिती, नाले खोलीकरण, शेततळे, नदी खोलीकरण अशा दुय्यम बाबींवर खर्च करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने ई-निविदा प्रक्रिया राबवून एजन्सींना कामे सोपविली आहेत.१६०६ गावांमध्ये प्रकल्प‘केम’ प्रकल्पाची पाळेमुळे अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये रुजलेली आहेत. त्यामधील ६४ तालुक्यांत एकूण १६०६ गावांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘केम’चा लाभ मिळणे आवश्यक आहे. २ लाख ८६ हजार ८०० कुटुंबसंख्येला लाभ मिळणे अपेक्षित असताना, हा प्रकल्प ठरावीक उपक्रमासाठीच राबविला गेला आहे.नोव्हेंबर २०१८ मध्ये ई-निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०१९ रोजी निधी मंजूर होताच संबंधित एजन्सीला कार्यारंभ आदेश दिले. आचारसंहितेपूर्वीच ३२.४० कोटी रूपयांच्या निधीतून विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.- दिगंबर नेमाडे,लेखाधिकारी, कृषिसमृद्धी समन्वयित कृषिविकास प्रकल्प