अमरावती : शनिवारच्या सांयकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली होती. त्यामुळे हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार एक-दोन दिवसांत पाऊस बरसणार अशी चिन्हे दिसूू लागली होती. रविवारी दुपारी ४ वाजतानंतर आकाश मेघाच्छादित झाले आणि तुरळक सरी बरसल्या. पावसाचा जोर फारसा नसला तरी कडाक्याच्या उन्हामुळे होणाऱ्या काहिलीपासून अमरावतीकरांना जरासा दिलासा मात्र मिळाला. मार्चच्या सुरूवातीला अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाली. अनेक ठिकाणी पडझडही झाली. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. परंतु मार्चच्या शेवटी गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. रविवारी तुरळक बरसलेल्या पावसाच्या सरींनी ही शक्यता खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आभाळ ढगांनी भरून आले व तुरळक सरी बसरल्या. मात्र, वृत्त लिहेपर्यंत कोठूनही गारपीट किंवा नुकसानीचे वृ्त्त नव्हते. रविवारी पारा ३९.०० अंश सेल्सिअस इतका होता. त्यामुळे सायंकाळी वातावरणातील सुखावह बदलामुळे गारवा अनुभवला. गव्हाचे नुकसानउन्हाळ्यात अचानक आलेल्या पावसामुळे गव्हाचे नुकसान होते. थोडा पाऊस पडला तरीसुध्दा गव्हाचा दर्जा कमी होतो. भाजीपाल्यावर रोग व कीडींची शक्यता असते. कांद्याचीही हानी होते, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ राजेंद्र जाणे यांनी दिली.
तुरळक सरी, आल्हाददायक गारवा
By admin | Published: March 30, 2015 12:05 AM