अमरावती : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने शैक्षणिक संस्थेच्या परिसरातही थुंकण्यास प्रतिबंध केला आहे. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव संतोष गायकवाड यांच्या साक्षीने राज्य शासनाचा हा निर्णय ५ ऑगस्ट रोजी जारी केला आहे. कोरोनाच्या विषाणूमुळे बाधित झालेल्या व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे इतर व्यक्तीही प्रभावी होऊ शकतात. तसेच क्षयरोगासारख्या अन्य आजाराची लागण होऊ शकते. यामुळे सर्व शैक्षणिक संस्था आणि परिसरात थुंकणयाविरोधात मार्गदर्शन सूचना शासनाने निश्चित केले आहे. यासंदर्भातील माहिती संबंधित मुख्याध्यापकांना सूचना देण्याबाबत अधिसूचना काढली आहे.
बॉक्स
या आहेत सूचना
सर्व शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थुंकण्यास प्रतिबंध
शिक्षकांनी सामायिक प्रार्थनेनंतर तसेच शालेय अभ्यासक्रम शिकविताना स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे.
ऑनलाइन शिक्षण देतानाही वर्ग सुरू होण्यापूर्वी थुंकल्यामुळे होणारे आजार व स्वच्छतेची मूल्ये याची माहिती द्यावी.
या सूचनांचे उल्लंघन झाल्यास शिक्षकांकडून तसेच पालक व सामान्यांकडूनही प्रतिव्यक्ती २०० रुपये दंड वसूल करावा.
दंड वसूल करण्याचा अधिकार संस्थाप्रमुख, मुख्याध्यापक व प्राचाऱ्यांना असेल.