लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रविवार उजाडताच रस्ते सुनसान झाले होते. अमरावती महानगरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजकमल चौक, जयस्तंभ चौक, जवाहरगेट, इतवारा बाजार, कॉटनमार्केट, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, अंबादेवी मार्ग, राजापेठ, गाडगेनगर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, इर्विन चौक, जवाहरगेट आदी भागातील दुकाने, बाजारपेठ बंद होत्या. राजकमल चौकासह अमरावतीच्या गजबजलेल्या भागांतही शुकशुकाट होता. रस्त्यावर केवळ पोलिसांची वाहने फिरताना दिसून आले. तर, चौका-चौकात पोलीस तैनात होते. रस्त्यावर फिरताना दिसताच कोण, कोठे चालल्याची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. जनता कर्फ्युने रविवारी अमरावती शांत झाल्याचे दिसून आले.गृह विलगीकरणात५२५ वर रुग्णजिल्ह्यात प्रवेशीत परदेशीय किंवा देशातंर्गत प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त पुणा, मुंबईसारख्या शहरातून आलेल्या व्यक्तीदेखील स्वताहून तपासणी करीत आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५३० चेवर झालेली आहे. यापैकी ५२५ व्यक्तींना गृह विलगीकरणात १४ दिवस राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत ५९ व्यक्तींचे नमुने चाचणीसाठी पाठविले त्यापैकी ४८ निगेटिव्ह आलेत. अद्याप ८ व्यक्तींचे नमुने अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आहे.परदेशातून परतलेल्या नागरिकांचे शुक्रवारपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले ४८ थ्रोट स्वॅबचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाने रविवारी ११ व तत्पूर्वी ४४ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. दोन नमुने तपासणीसाठी तांत्रिकदृष्ट्या त्रुटीमुळे रिजेक्ट झालेत. त्यामुळे तो पुन्हा पाठविण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी, होम क्वारंटाईन आदी उपाययोजना होत आहे. पथकांकडून प्रवाश्यांशी संपर्क व पाठपुरावा होत आहे. जिल्ह्यात रेल्वे, एस. टी. व खासगी बसमधील प्रवाश्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आंतरराज्य सीमेवरही तपासणीसाठी पथके नेमण्यात आली आहेत. आवश्यक दक्षतेबाबत जनजागृतीही केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.कलम १४४ लागू‘जनता कर्फ्यू’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी स्वत: निर्बंध लावून घेतले, ही बाब कौतुकास्पद आहे. येत्या १० दिवसांत अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे. बळाचा वापर करावा लागू नये, याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्याच्या शहरी भागात रविवारपासून कलम १४४ लागू करण्यात आले.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारीसहकार्य करा‘जनता कर्फ्यू’ शांततेत पार पडला. बंदोबस्तासाठी ७५० पोलीस, १५० अधिकारी तैनात होते. कर्फ्यू संपताच रात्री ९ ते पहाटे ५ वाजतादरम्यान संचारबंदी असणार आहे. २३ मार्चपासून जमावबंदी कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.- संजयकुमार बावीस्कर, पोलीस आयुक्त
स्वयंस्फूर्त ‘कोरोना’बंदी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 5:00 AM
जिल्ह्यात प्रवेशीत परदेशीय किंवा देशातंर्गत प्रवाश्यांची वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येत आहेत. याव्यतिरिक्त पुणा, मुंबईसारख्या शहरातून आलेल्या व्यक्तीदेखील स्वताहून तपासणी करीत आहेत. रविवारपर्यंत जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५३० चेवर झालेली आहे. यापैकी ५२५ व्यक्तींना गृह विलगीकरणात १४ दिवस राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
ठळक मुद्देशुकशुकाट : रस्ते निर्मनुष्य, रेल्वे स्थानकांवर ‘नो एन्ट्री’, रिक्षा बंद, शहर बसची चाके थांबली