शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

‘लोकमत’च्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Published: July 02, 2014 11:10 PM

‘लोकमत’वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रध्देय जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बुधवारी ‘लोकमत’च्या अमरावती युनिट कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला

अमरावती : ‘लोकमत’वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रध्देय जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ बुधवारी ‘लोकमत’च्या अमरावती युनिट कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संत गाडगेबाबा रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात १०० पेक्षा अधिक दात्यांनी रक्तदान केले. स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी हे संपूर्ण आयुष्य सामाजिक जाणिवेतून जगले. त्याच सामाजिक जाणिवेतून रक्तदान शिबिराचे आयोेजन दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनी केले जाते. या शिबिराचे उद्घाटन स्वातंत्र्य सेनानी माणिकराव मोरे काका यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आले. त्यांनी बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण केले आणि बाबुजींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आमदार यशोमती ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होत्या. स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीच्या विशेष कामगिरीबाबत मोरे काका यांना तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम व तत्कालीन राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले आहे.शिबिरासाठी संत गाडगेबाबा ब्लड बँक अँड कंपोनन्टचे सचिव सोपान गोडबोले, रक्त संक्रमण अधिकारी अनिल कविमंडन, अमित आरोकार, सुबोध क्षीरसागर, विकास खंडार, आकाश लाकडे, तश्विनी वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)