अमरावती : नुटा व राज्य शिक्षक संघाच्यावतीने शनिवारी शिक्षकांकरिता कोविड प्रतिबंधक लसीकरण शिबिर दंत महाविद्यालयात पार पडले. या शिबिराला शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लसीकरण शिबिरात माजी आमदार बी. टी. देशमुख, आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, वैद्यकीय अधिकारी विशाल काळे, गुल्हाने, विजुक्टाचे अरविंद मंगळे, बाळासाहेब वाघमारे यांनी भेट दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नुटाचे अध्यक्ष प्रवीण रघुवंशी, सुभाष गावडे, नितीन चांगोले, गजानन रघुवंशी, विलास ठाकरे, महेंद्र मेटे, राज्य शिक्षक संघाचे दिलीप कडू, भोजराज काळे, अनिल भारसाकळे, श्रीकांत लाजूरकर नंदकिशोर नवरे, प्रदीप नानोटे, श्रीकांत कडू, वीरेंद्र देशमुख, आय. टी. आय. संघटनेचे अनिल उभरहंडे, संदीप पालवे, सतीश आवारे आदींनी सहकार्य केले.
शिक्षकांच्या कोविड लसीकरण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:11 AM