आॅनलाईन लोकमतअमरावती : वडाळीच्या जंगलात भटक्या श्वानांचा वावर वाढला असून, श्वानांनी चितळाचा फडशा पाडला. ही शिकार बिबट्याने केल्याची दावा वनविभागाने केला आहे. जंगल संवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड सुरू असताना, वनविभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.शहरालगत समृद्ध जंगलाचा ठेवा आहे. मात्र, दिवसेंदिवस जंगलाचा ऱ्हास होताना दिसून येते. वडाळी वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास असून, हे जंगल जैवविविधतेचे भंडार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत नागरी हस्तक्षेप वाढल्याने जंगलातील वन्यप्राण्यांच्या अधिवासावर गदा आली आहे. त्यातच आता मोकाट व भटक्या श्वान वन्यप्राण्यांच्या जिवावर उठले आहे. वडाळी वनपरिक्षेत्रात शहरी श्वानांचा हैदोस वाढला आहे. वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आलेला आहे. मंगळवारी वडाळी वनपरिक्षेत्रातील एका तलावावर श्वानांच्या कळपाने एका नर चितळाची शिकार केली. दुसऱ्या दिवशी गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना चितळाचा अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले. घटनास्थळी आढळलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे व चितळाला खाण्याची पद्धत पाहून निष्कर्ष वनविभागाने काढला. मात्र, ही शिकार श्वानाने केल्याचा आरोप वन्यप्रेमी करीत आहेत. त्यामुळे चितळाची शिकार कुणी केली असावी, याबाबत संभ्रम कायम आहे.शवविच्छेदन ‘आॅन द स्पॉट’ का नाही ?वन्यजीव अधिनियमांनुसार बिबट्याने शिकार केली, तर त्या वन्यप्राण्याला त्याच ठिकाणी ठेवावे लागते. याकडे वनकर्मचाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे काम करावे लागते. मात्र, वनविभागाने चितळाचा मृतदेह ट्रकमध्ये टाकून शवविच्छेदनासाठी नेले होते.श्वानांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेस पत्रवडाळी जंगलात फिरणाऱ्या मोकाट श्वानांचा बंदोबस्त लावून कारवाई करण्यासंदर्भात उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांनी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निर्देश दिले. सोबतच जंगलात भटकणाºया श्वानांच्या बंदोबस्तासाठी महापालिका आयुक्तांना पत्र दिले जाईल. शहरी भागातील श्वान पकडून जंगलात सोडले जात असल्याने त्यांचा वावर वाढल्याचे निदर्शनास येत आहे
श्वानांनी केली चितळाची शिकार, नाव बिबटाचे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:25 PM
वडाळीच्या जंगलात भटक्या श्वानांचा वावर वाढला असून, श्वानांनी चितळाचा फडशा पाडला. ही शिकार बिबट्याने केल्याची दावा वनविभागाने केला आहे. जंगल संवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड सुरू असताना, वनविभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे.
ठळक मुद्देवनविभागाचे दुर्लक्ष : वनसंवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड