शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
4
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
5
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी
6
कोण आहेत सागर अदानी? ज्यांच्यावर लाचखोरीचा झालाय आरोप; मिळालीये मोठी जबाबदारी
7
बंडूकाकांच्या उमेदवारीचा कोणाला लाभ?; मंत्र्यांच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले लक्ष
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
10
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
11
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड?, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
12
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
14
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
15
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
16
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
17
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
19
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
20
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार

श्रीनिवास रेड्डींचा अखेर तात्पुरत्या कारागृहात १४ दिवस मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2021 11:23 PM

न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनिवास रेड्डी यांना शनिवार, १ मे रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंदीजनांना किमान १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन ठेवावे लागते. रेड्डी यांनाही अंध विद्यालयात क्वारंटाईन ठेवले आहे.

ठळक मुद्देव्हीआयपी लवाजामा संपला, सामान्य कैद्यासारखी वागणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुचर्चित दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अटकेतील आरोपी निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अखेर १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात मुक्काम करावा लागणार आहे. धारणी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मुकुंद गाडे यांच्या नायालयाने १ मे रोजी रेड्डींना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत रेड्डी हे मध्यवर्ती कारागृहाच्या नियंत्रणात राहणार आहेत.न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीनिवास रेड्डी यांना शनिवार, १ मे रोजी उशिरा सायंकाळी येथील कारागृहात आणण्यात आले. तत्पूर्वी त्यांची कोविड चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असल्याबाबतचे प्रमाणपत्र पोलिसांनी कारागृह प्रशासनाला दिले. कोविड नियमांनुसार कारागृहात येणाऱ्या प्रत्येक बंदीजनांना किमान १४ दिवस तात्पुरत्या कारागृहात क्वारंटाईन ठेवावे लागते. रेड्डी यांनाही अंध विद्यालयात क्वारंटाईन ठेवले आहे. तात्पुरत्या कारागृहात १४ दिवसांचा कालावधी झाल्यानंतर पुन्हा कोविड चाचणी करून मध्यवर्ती कारागृहात पाठविण्याची नियमावली आहे. परंतु, मेळघाट व्याघ्रचे क्षेत्र संचालकपदी कार्यरत असताना रेड्डी यांचा रूतबा, दरारा काही औरच होता. त्यांचा आदेश हा वनाधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी शिरसावध असायचा. मात्र, दीपाली प्रकरणात रेड्डी यांना २९ एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता अटक करून धारणी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानुसार रेड्डी यांचे दोन दिवस धारणी पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्येच गेले. मात्र, पोलीस कोठडी संपताच न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली व रेड्डी यांची थेट कारागृहात रवानगी झाली. येथील अंध विद्यालयात साकारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात शनिवारी सायंकाळी  रेड्डींना आणले. सामान्य कैद्यासारखे राहावे लागणार आहे. जेवण, पाणी हे स्वत:च्या हाताने घ्यावे लागेल. आता ‘ना नाेकर, ना चाकर’ केवळ कैदी म्हणून येथे बंदिस्त आहेत. सूर्योदय ते सूर्यास्त दिनचर्या ही रेड्डींना अन्य बंदीजनांसारखी घालवावी लागत आहे.  

शरीरावरील खुणा, डाग, जन्मत: वर्ण तपासलेन्यायालयाच्या आदेशानुसार धारणी पोलिसांनी श्रीनिवास रेड्डींना येथील अंध विद्यालयात साकारलेल्या तात्पुरत्या कारागृहात बंदीजन म्हणून आणले. कारागृहाचे शिपाई, हवालदार यांनी न्यायालयीन आदेश बघितल्यानंतर रेड्डींची कारागृहाच्या रेकॉर्डवर आराेपी म्हणून नोंद केली. त्यानंतर त्यांच्या शरीरावरील खुणा, डाग, जन्मत: असलेले वर्ण आदींंची बारकाईने तपासणी करताना तशा नोंदी घेतल्या. त्यानंतर जेवणासाठी ॲल्युमिनियमचे ताट आणि पाणी पिण्यासाठी ग्लास देण्यात आले. सामान्य कैद्यासारखे रविवारी रांगेत उभे राहून सकाळचे जेवणदेखील रेड्डींनी घेतले, अशी माहिती जेल सूत्रांकडून मिळाली.

कारागृहात आराेपी म्हणून येणारी प्रत्येक व्यक्ती ही आमच्यासाठी समान असते. मग ती राजकीय असो, अधिकारी असाे, वा व्हीआयपी त्यांना कैदी म्हणून समान वागणूक दिली जाते. श्रीनिवास रेड्डी यांना शनिवारी सायंकाळी उशिरा आणले गेले. अंध विद्यालयात तात्पुरत्या कारागृहात सामान्य कैद्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सीसीटीव्ही कॅमेेरे बसविले आहेत. - रमेश कांबळे, अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह अमरावती

 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणforest departmentवनविभाग