परतवाडा : दीपाली चव्हाणप्रमाणेच मेळघाटातील एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला पत्नी आजारी असताना सुट्टी नाकारल्याने दोन वेळा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार तपासणी समितीपुढे आला. व्याघ्र प्रकल्पातील श्रीनिवास रेड्डी व विनोद शिवकुमार या जोडीच्या अत्याचाराचे किस्से कर्मचाऱ्यांनी लेखी बयाणात नोंदविण्याची धक्कादायक माहिती आहे.
हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अत्याचाराचे अनेक किस्से आता बाहेर पडू लागले आहेत. दीपाली चव्हाण यांना झालेला मनस्ताप अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. मात्र, व्याघ्र प्रकल्पातील अनेक वरिष्ठ अधिकारी क्षेत्रीय व कार्यालयीन कर्मचारी यांच्यावर निलंबित अप्पर प्रधान संरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी व आरोपी तथा निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनी प्रचंड मनस्ताप देऊन आर्थिक नुकसान केल्याचे पुढे येत आहे.
बॉक्स
सुटी न दिल्याने दोन वेळा झाला गर्भपात
मेळघाटात कार्यरत एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पत्नी गरोदर असताना दुसऱ्या जिल्ह्यात त्यासुद्धा शासकीय सेवेत आहेत. मेळघाटात कार्यरत नवविवाहित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला पत्नी आजारी असल्याने सुटीवर जायचे होते. संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला कारण सांगून सुटी मागितली. मात्र, सुट्टी देण्याऐवजी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक देऊन पूर्वी सांगितलेल्या कामाचे पत्र बजावले होते. एवढेच नव्हे तर श्रीनिवास रेड्डी यांनीदेखील सांगितले होते. त्यावर सुटीवर जाणाऱ्या त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे वेतन थांबविण्याचे पत्र दिले. एकीकडे आजारी गर्भवती पत्नीला उपचारार्थ नेण्याची धावपळ, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे प्रचंड मनस्ताप त्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला सहन करावा लागला. सुट्टी न मिळाल्याने गर्भवती पत्नीला मेळघाटात बोलाविले. तीन ते चार बसगाड्या बदलवून आल्याने झालेल्या त्रासात गर्भपात झाला. त्यामुळे मनस्ताप देणारे गंभीर संकट या नवदाम्पत्यावर ओढावले. परत दुसऱ्यांदा रक्तदाब वाढल्याने सुटी न मिळाल्याने आजारी पत्नीला वेळेत उपचारासाठी सुटी न मिळाल्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा गर्भपात झाल्याचे भयानक वास्तव समितीपुढे नोंदविल्याने मेळघाटातील रेड्डी, शिवकुमार या जोडीचे अत्याचाराचे किस्से बाहेर येऊ लागले आहे.
बॉक्स
रेड्डीकडे तक्रारी, सर अब मै सुधर गया'
गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हा वरिष्ठ ते कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत अनेक प्रकारे मानसिक आर्थिक त्रास अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे मेळघाट दौऱ्यादरम्यान अनेकदा सांगितल्याचे बयाणात नोंदविल्याची माहिती आहे. तसेच विनोद शिवकुमार, रेड्डी यांना "सर अब मै सुधर गया" इनका सब कर देता, बोलून मोकळा व्हायचा, शिवकुमार या शब्दाने तो किती अत्याचार करीत होता. हे त्यानेच तक्रारकर्त्या कर्मचाऱ्यांनी पुढे कबूल केले, हे विशेष. तरी रेड्डी, शिवकुमारवर प्रचंड विश्वास दाखवून त्याची प्रत्येक गोष्ट खरी मानत होता.
बॉक्स
घाबरू नका, प्रेस, पोलीस, न्यायालय पाठीशी
तपासणी समितीत अमराठी अधिकाऱ्यांचा भरणा अधिक असल्याच्या कारणावरून या समितीवर संशय व्यक्त होत होता. मात्र, मेळघाट दौऱ्यादरम्यान एका अधिकाऱ्याने वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्भीडपणे बयाण नोंदवायला सांगितले. ड्रेस बोलके करीत पोलिसांनी न्यायालयात तुमच्यासोबत असल्याने तुमचे कोणीच काही करू शकत नाही, अशी हिंमतही कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर अश्लील शिवीगाळ, दारू मटणाच्या पार्ट्या रात्री-बेरात्री बोलावणे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे अनेकांनी झालेले अत्याचार अन्यायाला वाचा फोडली आहे.