लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : चिखलदरा येथून ३० प्रवासी परतवाड्याला घेऊन येणाºया परिवहन मंडळाच्या एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाच्या प्रसंगावधानाने रविवारी सकाळी मोठा अपघात टळला. शिवमंदिर घाटवळणावर सदर घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भंगार गाड्यांबद्दल प्रचंड रोष निर्माण झाला आहे.परतवाडा आगाराची बस क्रमांक एमएच ४०-८८४६ क्रमांकाची बस धामणगाव गढी मार्गे चिखलदरा येथून परत येत असताना सदर अपघात घडला. यात कुणीच प्रवासी जखमी झाले नसल्याचे परिवहन विभागातर्फे सांगण्यात आले. चालक अतुल निराळे, तर वाहक मो. परवेज परतवाडा येथून रविवारी सकाळी ८.३० वाजता चिखलदरासाठी बसफेरी नेली होती.शिवमंदिरनजीकच्या घाटवळणावर बसचे ब्रेक न लागल्याने चालकाने प्रवाशांनी भरलेली बसगाडी पहाडाला लावली. त्यामुळे बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर प्रवासी सुखरूप बचावले. चालकाच्या समयसुचकतेने उजव्या बाजूने असलेल्या दरीत बस कोसळण्यापासून बचावली, हे विशेष.परतवाडा भंगार गाड्यांचे आगारजिल्ह्यात अमरावतीनंतर ग्रामीण भागात सर्वात मोठे परतवाडा आगार असून सत्तर पेक्षा अधिक बसगाड्या असून तिनशेच्या जवळपास विविध ठिकाणी फेºया करतात. परतवाडा-चिखलदरा व मेळघाटात नेहमी नादुरूस्त आणि भंगार गाड्या पाठविल्या जात असल्याने परिवहन मंडळाने प्रवाशांच्या जिवाशी खेळ चालविला आहे.
बसला धामणगाव गढी शिव मंदिरानजीक अपघात झाला. बस नादुरूस्त आहे किंवा कशामुळे यांत्रिक बिघाड झाला याची तपासणी करण्यात येईल.- नीलेश मोकळकर,सहायक वाहतूक नियंत्रक, परतवाडा आगार