लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : येथून सातरगावमार्गे चांदूरबाजारकडे जाणारी एसटी बस उलटून ५० प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता दरम्यान उलटली. यात ५० प्रवासी जखमी झालेत. त्यापैकी १९ गंभीर जखमींना उपचारार्थ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची घटना घडताच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.प्राप्त माहितीनुसार, चांदूरबाजार डेपोची बस क्रमांक एमएच ४०, एन-८२८० ही तिवसा येथून चांदूरबाजार कडे शुक्रवारी दुपारी ३ वाजता निघाली. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह एकूण ५५ ते ५५ प्रवासी होते. तिवसा येथून सातरगावमार्गे २ किलोमीटर अंतरावर अचानक समोरून मालवाहू वाहन दुचाकीला ओव्हरटेक करीत समोर येताच त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या खाली तोल जाऊन पलटी झाली. ज्यामुळे भरगच्च भरलेल्या बसमधील सर्व प्रवासी एकावर एक दबल्याने अनेक जणांना दुखापत झाली.२१ प्रवासी गंभीर जखमीअपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर काही प्रवाशांना तिवसा येथे प्राथमिक उपचारानंतर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये बालाजी खैरकार (७०), संगीता विलास अवघड (७५, बºहाणपूर), संगीता वानखडे, रीता टिचकले, योगेश देवरे, निखिल राऊत(१४, शेंदोळा), पल्लवी शेखार (२२), माधव भलावी (४९, रा. शिरलस), प्रज्ज्वल लांडे (१९, सातरगाव), माणिक बकराम बेहरे (७०, पुणे, ह.मु. नेरपिंगळाई), पुरुषोत्तम किसन राऊत (७२, नेरपिंगळाई), वैष्णवी विजय ठाकरे (२०, रा. राजूरवाडी), शीतल विनोद गोरे (२१, ममदापूर), कृष्णा विनोद गोरे (३ ममदापूर), हरिभाऊ टेकाडे (५५, सातरगाव), वृषाली शरद गावंडे (धामणगाव काटपूर), प्रिया शंकर टेकाम (१९, राजूरवाडी), गुंजन शरद गावंडे (१०), जयश्री टुणुकले, नीलेश राऊत (१४, करजगाव), विजया संजय टिचकले (३५) असे २१ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.३३ प्रवासी किरकोळ जखमीशुभांगी शिवानंद देशमुख (१९, सातरगाव), सविता वामन होले (२१, राजूरवाडी), दिलीप गणपत फुसे (४६, नेरपिंगळाई), शांताबाई ज्ञानेश्वर नागरीकर (७०, तलेगाव ठाकूर), मुक्ता प्रभाकर बेले (६३, तळेगाव ठाकूर), नीलेश सनेश्वर (२७, पोरगव्हाण), मनीषा नीलेश सनेश्वर (२२, पोरगव्हाण), हरिभाऊ सूर्यभान होले (८५, राजूरवाडी), गणेश सूर्यभान मेंढे (६०, रा.नेरपिंगळाई), जानराव सहारे (५०, आमला विश्वेश्वर), मंदा जानराव सहारे (५०, आमला), मीना किरण चौधरी (५५, शिरलस), अलका अशोक चौधरी (५७, शिरलस), प्रभा शंकर डोहने (३०, निंभारणी), सविता गणेश बोदरे (२१, खेडी, ता.नरखेड), दीपक रामहरी ईसळ (४२, निंभारणी), संतोष राघोजी तंबाखे (३९, वरुडा), मंदा विठ्ठल विधळे (६०, माधान), प्रतिभा गजानन इंगोले (४८, बोराळा), मीना गजानन बुरघाटे (४५, वाठोडा), शिवानी जयवंत विधळे (२१, जवळा शहा.), नीलिमा प्रमोद काळे (४८, रा.सांगळूद अंबादेवी, अकोला), सुनीता जयवंत विधळे (४७, जवळा शहापूर), नामदेव इंगळे (५५, अनकवाडी), अर्पित संजय टिचकले (१५, सातरगाव), ज्योती अशोक गायकवाड (३५, चेनुष्टा), वृषाली बाबाराव वानखडे (२०, राजूरवाडी), दीपाली अशोक तवाने (२०, राजूरवाडी), पल्लवी सुरेशआप्पा चौधरी (२०, सातरगाव), आरती मनोहर धानोरकर (२०, सातरगाव), विमल भीमराव देशमुख (८३, काटपूर धामणगाव), अविनाश पंजाब पाटील (४०, शिराळा, वाहनचालक), रामेश्वर सुखदेव पवार (२८, रा.विचोरी,वाहक) यांना किरकोळ मार लागला आहे.आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून विचारपूसतिवसा बसस्थानकाला आगाराचा दर्जा मंजूर असूनही येथे आगार नाही. त्यामुळे तिवसा बसस्थानकाला चांदूरबाजार, मोर्शी, चांदूर रेल्वे येथून एसटी बस पुरवतात. मात्र, या सर्व भंगार बस आहे. अपघाताची माहिती मिळताच आमदार यशोमती ठाकूर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जयंत देशमुख, तिवसा नगराध्यक्ष वैभव वानखडे, तिवसा वाहतूक नियंत्रक प्रतीक मोहोड, लढाचे संजय देशमुख, योगेश लोखंडे, भाजपचे अमित बाभूळकर यांनी तिवसा ग्रामीण रुग्णालयात दाखल जखमींची विचारपूस केली. तहसीलदार पार्थ गिरी यांनी शासनावतीने जखमींची विचारपूस केली. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी होती.
एसटी बस उलटली; ५० जखमी, २० गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 10:19 PM
येथून सातरगावमार्गे चांदूरबाजारकडे जाणारी एसटी बस उलटून ५० प्रवासी जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता दरम्यान उलटली. यात ५० प्रवासी जखमी झालेत. त्यापैकी १९ गंभीर जखमींना उपचारार्थ अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची घटना घडताच सर्व प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
ठळक मुद्देमालवाहू वाहनास वाचविण्याच्या प्रयत्नात झाला अपघात : तिवसा - सातरगाव मार्गावरील घटना