फोटो पी २० वरूड
राजुरा बाजार : राज्य महामंडळाच्या बस बसचालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवून राजुर बाजारकडे जाणाऱ्या एका कारला जबर धडक दिली. यातील दोघे सुखरूप बचावले. मात्र, कारचा मागील भाग चकणाचूर झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १.४५ वाजतादरम्यान राजुराबाजार-वरूड दरम्यान घडली. पोलिसांनी एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
राज्य महामार्ग क्र. २४४ वर वरूड आगाराची वरूड-आर्वी बस क्र. एमएच २० डी ९१६९ आर्वीला जात होती. बसचालक मद्यधुंद असल्याने बस अनियंत्रित होऊन पुढे जाणाऱ्या कारला धडकली. मुलताईहून पाटेकर दाम्पत्य वर्धाकडे कार क्र.एमपी ४८सी ८१५१ ने जात होते. बसम्जबरजोरदार धडक दिल्याने कारचा मागील भाग चकणाचूर झाला. पती-पत्नी थोडक्यात बचावले. ही घटना मंगळवारी वरूड-राजुरा बाजार रस्त्यावर घडली. कारचालक दिलीप नंदू पाटेकर (रा. चांदोरी खुर्द ता. मुलताई) यांच्या फिर्यादीवरून वरूड पोलिसांनी बसचालक उमेश गेडाम (रा. यवतमाळ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून बस चालकाला ताब्यात घेतले. पुढील तपास वरूड पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात, बीट जमादार दीपक जाधव, पो कॉ.मिलिंद वाटाणे, सुदर्शन देशमुख करीत आहे.