शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

एसटी बसची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:48 PM

सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून परिवहन महामंडळाच्या चालक, वाहकांसह कर्मचाºयांनी बेमुदत बंद पुकारल्याने जिल्हाभरातील आगारांतून एकही बस धावली नाही.

ठळक मुद्देप्रवाशांचे हाल : चालक, वाहकांचा बेमुदत संप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/परतवाडा : सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून परिवहन महामंडळाच्या चालक, वाहकांसह कर्मचाºयांनी बेमुदत बंद पुकारल्याने जिल्हाभरातील आगारांतून एकही बस धावली नाही. परिणामी हजारो प्रवाशांंचे हाल झाले, तर खासगी ट्रॅव्हल्स चालकांची बल्ले बल्ले झाली.राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी बसची चाके थांबल्याचा फटका शहरासह ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान, परतवाडा येथे संपाचे चित्रीकरण करणाºया अज्ञात छायाचित्रकाराने कुणासाठी चित्रीकरण करीत असल्याची माहिती न दिल्याने संतप्त कर्मचाºयांनी त्याला चोप देत पिटाळून लावल्याने थोडा वेळ तणाव निर्माण झाला होता. अमरावती आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे बस स्थानकासमोरूनच प्रवासी वाहतुकीला खासगी वाहतूकदारांना वाव मिळाला. त्यांनी अव्वाच्या सव्वा दर आकारून प्रवाशांची अक्षरश: लूट केली. बाहेरगावाहून आलेल्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दिवाळीनिमित्त घरी परतणाºयांना एसटी बंदचा फटका बसला. जिल्ह्यात एकूण आठ आगार असून, सुमारे ४०० बस आहेत. ग्रामीण भागात सर्वात मोठे परतवाडा आगार असून, येथून परिवहन महामंडळाच्या ७८ बसगाड्यांद्वारे ३५० फेºया करण्यात येतात. दररोज किमान सहा लाख रुपये उत्पन्न मिळते. आगारात चालक, वाहक व मेकॅनिक असे जवळपास ४०० कर्मचाºयांनी बेमुदत संपात सहभाग घेतला आहे.अमरावती आगारातून दरदिवसाला ११०० बसेस धावतात. दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. मंगळवारी एका दिवसाचे २५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याची माहिती अमरावती बस स्थानक प्रबंधक उमेश इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.काळी-पिवळी जोरातमंगळवारी एसटी बसची चाके थांबल्याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागात काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी घेतला आहे. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी शहरात येणाºयांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी काळी-पिवळी चालकांनी ‘कॅश’ केली.मागण्यांसाठी संपकरी चालक, वाहक, कर्मचारी आक्रमक दिसून आले. ३ अधिकारी वगळता परतवाडा आगारातील कर्मचारी संपावर गेल्याची माहिती आगारप्रमुख अनिकेत बल्लाळ यांनी दिली.ग्रामीणसह शहरीभागात कोंडीपरतवाडा आगारातून प्रत्येकी १५ मिनिटाने अमरावतीसाठी बस असून, अकोला, नागपूर, होशंगाबाद, खंडवा, भैसदही व जिल्हाभरातील तालुक्यांत बसफेºया जातात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फेºया असल्याने सोमवारी संपामुळे प्रवाशांना खासगी वाहनांतून प्रवास करावा लागला. मात्र, खासगी वाहनांची संख्या अल्प असल्याने हजारो प्रवाशांंना त्याचा फटका बसला.