शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

एसटी वाहकाची महिला प्रवाशांसोबत हुज्जत

By admin | Published: August 21, 2016 12:09 AM

अमरावती-नागपूर मार्गे धावणाऱ्या एसटी बसमधील मुजोर वाहक कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली आहे.

नागरिकांशी मुजोरी : पोलिसांकडून मध्यस्थीगुरुकुंज (मोझरी) : अमरावती-नागपूर मार्गे धावणाऱ्या एसटी बसमधील मुजोर वाहक कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली आहे. महिला, विद्यार्थी, वृद्धांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. शुक्रवारी रात्री तिवसा येथून बसलेल्या महिला प्रवाशांसोबत वाहकाने हुज्जत घालून अशोभनीय शिवराळ भाषा वापरली. त्यामुळे गुरुकुंजातील बसस्थानकात या वाहकाला प्रवाशांनी काही काळ जाब विचारण्यासाठी थांबविले व पोलिसांना सदर बाब कडवून त्यांचा मार्फत या या मुजोर वाहकावर कारवाची ची मागणी केलीतिवसा येथून गुरुकुंज मोझरी करिता प्रवाशांसोबत ३ महिला प्रवासी चढल्या. नागपूर-वाशीम, एम.एच ४०/वाय ५५४७ क्रमांकाचा वाहक सी.एल.पवार यांनी सदर बसला मोझरी थांबा नाही. गाडीत चढले तर रात्रीच्या वेळी अमरावतीला घेऊन जाऊ, असा दम भरला. त्यामुळे महिला प्रवाशांनी सदर वाहकाला विनंती करून मोझरी येथे बस थांबा असल्याची आठवण करून दिली. त्यावर वाहकाने अशोभनीय भाषेत हुज्जत घातली. बस थांबून ठेवली तरी या महिला बसमधून उतरत नाही, असे दिसल्यावर तुम्हाला अमरावती घेऊन जाऊ, अशी धमकी भरली. त्यामुळे घाबरलेल्या या महिला प्रवाशांनी निकटवर्तीयांना माहिती दिली. तिवसा पोलिसांना दूरध्वनीवरून कळविले गेले. बस मोझरी डेपोत येताच थांबविली. बसचालक व वाहकाला थांबा नाही का!असा जाब विचारला असता चालकाने आपली जबाबदारी झटकत सदर वाहकानेच थांबा नाकारून प्रवाशांसोबत हुज्जत घातल्याचे सांगितले. याचवेळी तिवसा वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रवाशांना दरडावून मोझरी येथे सुपर बसला थांबा नाही. आम्हालाही अनेकदा या प्रसंगाला सामोरे जावे लागले, असे वक्तव्य केले. आमच्या जीवाची जवाबदारी कोण घेईल!तुम्ही घ्याल का, असा सवाल महिलांनी केला असता हात झटकले व बस वाहकाला कुठलीही आवश्यक माहिती न विचारता बस जाऊ दिली.