महामंडळाने आतापर्यंत मालवाहतूक ट्रकद्वारे एकूण १ हजार २७६ फेऱ्या चालविल्या आहेत. एकूण १ लाख ९३ हजार २५१ किलोमीटर वाहतूक झाली आहे. यात महामंडळाला ६७ लाख १२ हजार रुपयांचे उत्पन्न झाले. मालाची वाहतूक पूर्णत: सुरक्षित आणि वेळेत वितरण यामुळे नागरिकांनी सेवा घेण्यास अनुकूलता दर्शविली आहे. सदर सेवा ही २४ तास सुरू आहे.
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडऊन जाहीर करण्यात आला. सामान्य प्रवाशांकरिता महामंडळाची वाहतूक काही अपवाद वगळता स्थगित करण्यात आली. १ जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली. मर्यादित प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्याने विभागास दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले. त्यानंतर २१ ऑगस्टपासून ५० टक्के प्रवासी क्षमतेने आंतरजिल्हा वाहतुकीस परवानगी देण्यात आली. त्यानंतर १८ सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानुसार अमरावती विभागातील सर्व आगारांची जिल्हा वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. मात्र, प्रवासी प्रतिसाद अत्यल्प असल्यामुळे १० ते १२ लाख उत्पन्न मिळाले.
बॉक्स
दिवाळीत चांगला प्रतिसाद
नाव्हेंबर महिन्यात दिवाळी सण असल्याने प्रवासी वाहतुकीस चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यानुसार दिवाळीनंतर दररोज ३३ ते ३४ लाख उत्पन्न झाले आहे. आंतरराज्य वाहतुकीमध्ये हैद्राबाद, खंडवा, भोपाळ, बऱ्हाणपूर, छिंदवाडा, बैतुल, मुलताई, पांढुर्णा अशा बस सुरू करण्यात आल्या आहेत. आंतरजिल्हा वाहतुकीमध्ये नागपूर, पुणे, औरंगाबाद, नांदेड, परभणी, अंबेजोगाई, माहूर, मांडवी, लातूर, बीड, बुलढाण, चंद्रपूर, नाशिक, जळगाव अशा इतरही फेऱ्या सुरू करण्यात आल्या.