अमरावती : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत ३१ मेपर्यंत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश होते. दरम्यान ९ जुलै रोजी नव्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण बदली प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सोमवार, २६ जुलैपासून सुरू होणार आहे. यामध्ये तीन दिवसात दीड हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ११ विभाग मिळून १०,७१७ कर्मचारी आहेत. त्यापैकी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे दीड हजार कर्मचाऱ्यांना आपले यापूर्वीचे काम सोडून नवी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. २६ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन, सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, कृषी, वित्त आणि महिला व बालविकास या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. दुसऱ्या दिवशी २७ जुलै रोजी शिक्षक संवर्ग वगळून शिक्षण, पंचायत आणि सामान्य प्रशासन विभागातील, तर २८ जुलैला केवळ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. एकूण तीन दिवसात ही बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात केली आहे.
बॉक्स
असे आहेत संवर्गनिहाय कर्मचारी
अराजपत्रित गट ब सरळसेवा ४४०. पदोन्नती ४९० एकूण ९३०
गट क सरळसेवा ७७८८ पदोन्नती ७२५ एकूण ८५१३
गट क सरळसेवा १२३६ पदोन्नती ३८ एकूण १२७४
एकूण सरळ सेवा ९४६ पदोन्नती १२५३ एकूण १०७१७
बॉक्स
गत वर्षी १० टक्के बदल्या प्रशासकीय कारणावरून तर ५ टक्के बदला विनंतीनुसार करण्यात आल्या होत्या. तेच सूत्र यावषीर्ही वापरले जाईल. बदली करताना शासनाचे सर्व नियम, नियुक्ती, पदोन्नती, आरक्षण, बिंदुनामावली अशा अनेक बाबी पार पाडावे लागते. त्यामुळे पुन्हा कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कोरोनाची भीती कायम असल्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनी सांगितले.