लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गाडगेनगरातील समाधी स्थळ मंदिरात श्री संत गाडगेबाबांचा ६३ वा पुण्यतिथी महोत्सव १४ रोजी सकाळपासून विविध प्रबोधनपर कार्यक्रमांनी प्रारंभ झाला. संत गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने २१ डिसेंबरपर्यंत येथे विविध कार्यक्रम होतील.गाडगेबाबांच्या ६३ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या अनुषंगाने मंदिरसमोरील खुल्या मैदानात यात्रा भरली आहे. मंदिरात दर्शनाकरिता व यात्रेत सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. येथे लहान मुलांकरिता खेळणी व विविध वस्तूंची दुकानेसुद्धा थाटली असून विविध प्रकारचे झुला हा आर्कषण ठरत आहे. येथे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलसुद्धा लागले आहे. मंदिर परिसर सजविण्यात आला असून, रात्री मंदिरात रोषणाई करण्यात येते.पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ शनिवारी सकाळी ९.३० वाजता बाबांच्या समाधीचे पूजनाने महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार, नगरसेवक चंद्रकांत बोमरे, सुरेखा लुंगारे, प्रमिला जाधव, प्रदीप बाजड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी शास्त्रीजी महाराज (वाराणसी) यांचे शिष्य हभप हरिओम महाराज निंभोरकर (रा. माणिकग्राम धोत्रा) यांनी श्रीमद् भागवत कथेचे वाचन केले. नामदेवराव रोडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अंध व दिव्यांगांना अन्नदान करण्यात आले. दुपारी गुरुदेव महिला भजनी मंडळांनी भजने म्हटली. यानंतर हभप हरीओम महाराज निंभोरकर यांचे श्रीम्द भागवत कथा वाचन झाले.सायंकाळी ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख व सहकारी यांनी सामुदायिक प्रार्थनेचे सादरीकरण केले. रात्री महंत गोविंदराजबाबा शास्त्री ( रिद्धपूर) यांचे व्याख्यान व सचिन काळे यांच्या राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला.महोत्सवात दररोज सकाळपासूनच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक प्रकाश महात्मे यांनी दिली. दिवसभर हजारो भाविकांनी मंदिरात भेट देऊन गाडगेबाबांच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले. कीर्तन व विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रम ऐकण्याकरिता भाविकांनी विशेषत: महिलांनी गर्दी केली होती.आजचे कार्यक्रमरविवारी सकाळी ५ वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता योगासन व प्राणायम, सकाळी ९.३० वाजता हभप हरिओम महाराज निंभोरकर यांचे श्रीमद् भागवत कथेचे वाचन, १२.३० वाजता अंध व दिव्यांगांना अन्नदान, १ वाजता राष्ट्रसंत महिला मंडळाच्यावतीने भजन, ४ वाजता ताराबाई गायकवाड यांचे गाडगेबाबांच्या जीवकार्यावर प्रवचन, ५ वाजता हरीपाठ, ६ वाजता सामुदायिक प्रार्थना, ७ वाजता संदीप तडस यांचे व्याख्यान, ८ वाजता संघपाल महाराज (पवनुर) यांचा सप्तखंजिरी कार्यक्रम मंदिरात होणार आहेत.
संत गाडगेबाबांच्या ६३ व्या पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 6:00 AM
पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ शनिवारी सकाळी ९.३० वाजता बाबांच्या समाधीचे पूजनाने महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती बाळासाहेब भुयार, नगरसेवक चंद्रकांत बोमरे, सुरेखा लुंगारे, प्रमिला जाधव, प्रदीप बाजड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ठळक मुद्देमंदिरात रोषणाई । आठवडाभरात विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रम