जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडचे तूर खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा तिवसा तालुका काँग्रेस कमिटीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.तिवसा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू व्हावे, यासाठी तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीने डिसेंबर महिन्यातच ठराव घेऊन मागणी केली होती. याबाबत ४ जानेवारी २०१७ रोजी पत्रव्यवहारसुद्धा केला. याकरिता आमदार यशोमती ठाकूर यांनी नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, जिल्हा उपनिंबधक, व जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहारसुद्धा केला. याबाबत आमदारांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून तिवसा तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतातूर आहे आणि येथील तूर खरेदी तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले.येत्या ३ दिवसांत तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष मुकुंदराव देशमुख, तिवसा नगरपालिका उपाध्यक्ष वैभव वानखडे, जि.प.सदस्य अभिजित बोके, बाजार समितीचे सभापती रामराम तांबेकर, संचालक योगेश वानखडे, पं.स. सदस्य लुकेश केने, पं.स. सदस्य मंगेश भगोले, शहर अध्यक्ष अतुल देशमुख, युवक काँग्रेस उपाध्यक्ष रितेश पांडव, संदीप आमले, नगरसेवक मधुकर भगत, सागर राऊत, उमेश ऊर्फ पिंटू राऊत, स्वप्निल गंधे, आशिष ताथोडे, वैभव काकडे, अंकुश बनसोड, स्वप्निल केने, विशाल केने, बंटी बंगरे आदी उपस्थित होते.
तिवस्यात नाफेडचे केंद्र सुरू करा
By admin | Published: May 14, 2017 12:08 AM