लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वनक्षेत्र अथवा जंगलातील वनवणवा नियंत्रणास रविवार, १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाले आहे. वनकर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’च्या सूचना देण्यात आल्या असून, वन बीटनिहाय आग नियंत्रणासाठी जबाबदारी निश्चित केली आहे. जंगलात कृत्रिम आग लागल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित वनकर्मचारी, अधिकारी कारवाईचे लक्ष्य असेल. विभागस्तरावर वनवणवा संरक्षण चमूंचे कक्ष स्थापन केले जाणार आहे.फेब्रुवारी महिन्यातच सूर्य अधिक तापू लागला आहे. दरवर्षी जंगलांना आगी लागण्याचा घटना घडतात. मात्र, गत १० वर्षांत वनवणव्यामुळे ठरावीक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केलेला आहे. विभागातील वनकर्मचाºयांची १० फेब्रुवारी रोजी मार्डी मार्गालगत मासोद येथील फुलपाखरू उद्यानात वनवणवा नियंत्रण व नियोजनाबाबत कार्यशाळा पार पडली. यात मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, विभागीय वनाधिकारी हरिचंद्र वाघमोडे आदींनी कर्मचाऱ्यांना वनवणवा नियंत्रणासाठी टिप्स दिल्यात. १५ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान जंगलात जाळ रेषा तयार करणे, आगीवर नियंत्रणासाठी ब्लोअर मशीन, ग्रास कटर, अग्निरक्षकांची नेमणूक झाली. व्याघ्र प्रकल्पासह राखीव वने, प्रादेशिक वन विभागाचे जंगलाच्या वनवणव्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश आहे.वनवणवा नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. पुरेसा कर्मचारी वर्ग, साहित्य, नियंत्रण कक्ष आणि वनवणवा स्थळांवर सूक्ष्म लक्ष आहे. वनवणवा नियंत्रणास प्रारंभ झाला.- गजेंद्र नरवणे, उपवनसंरक्षक, अमरावती
जंगलातील वनवणवा नियंत्रणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 6:00 AM
फेब्रुवारी महिन्यातच सूर्य अधिक तापू लागला आहे. दरवर्षी जंगलांना आगी लागण्याचा घटना घडतात. मात्र, गत १० वर्षांत वनवणव्यामुळे ठरावीक भागातील जंगलक्षेत्रांना लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केलेला आहे. विभागातील वनकर्मचाºयांची १० फेब्रुवारी रोजी मार्डी मार्गालगत मासोद येथील फुलपाखरू उद्यानात वनवणवा नियंत्रण व नियोजनाबाबत कार्यशाळा पार पडली.
ठळक मुद्देवनकर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’चे आदेश : विभागस्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन