लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भुसावळ रेल्वे येथे विविध विकास कामांसाठी ५ ते २० एप्रिल दरम्यान बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागाने घेतला होता. त्यामुळे नागपूर- भुसावळ लोह मार्गावरील सर्वच पॅसेंजर गाड्या रद्द केल्यात. मात्र, २० एप्रिलपासून भुसावळ- न्यू अमरावती- नरखेड आणि वर्धा-भुसावळ या दोन पॅसेंजर गाड्यांना प्रारंभ झाला आहे. त्यामुळे गरीब, सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.भुसावळ रेल्वे येथे विकास कामे पूर्णत्वासाठी १९ एप्रिल रोजी १६ तासांचे मेगाब्लॉक करण्यात आला. यादरम्यान मोठ्या स्वरु पाची विकास कामे मार्गी लागली. मात्र, भुसावळ रेल्वे स्थानकावर अद्यापही किरकोळ कामे पूर्ण व्हायची आहे. भुसावळ -नागपूर लोहमार्गावर पहिल्या टप्प्यात दोन पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भुसावळ ते नरखेड आणि वर्धा ते भुसावळ या दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या गरीब, सामान्य प्रवाशांना पॅसेंजर गाड्या सुरु झाल्यामुळे प्रवासादरम्यान आर्थिक ताण कमी पडणार आहे. मात्र, मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या अमरावती-सुरत एक्स्प्रेस,अमरावती-पुणे (वातानुकूलित) एक्स्प्रेस, भुसावळ-निजामुद्दीन (गोंडवाना एक्स्प्रेस), हावडा -लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस, हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस, गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्या सुरू करण्याविषयी निर्णय झालेला नाही. भुसावळ ते नागपूर दरम्यान धावणाºया मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या ७८ फेºया रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ रेल्वे स्थानकाहून जाणाºया हॉलिडे स्पेशल सहा गाड्यांच्या फेºया रद्द करण्यात आल्या आहे.पहिल्या टप्प्यात नरखेड-भुसावळ आणि वर्धा- भुसावळ या दोन पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या आहेत. मेगा ब्लॉकमुळे रद्द झालेल्या मेल, एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्याबाबत निर्णय झाला नाही.-शरद सयामवाणिज्य निरिक्षक, बडनेरा.३२ पॅसेंजर गाड्यांच्या फेऱ्या कधी सुरू होणारभुसावळ रेल्वे स्थानकावर विकास कामे पूर्णत्वासाठी सर्वाधिक पॅसेंजर गाड्या रद्दचा फटका बसला आहे. एकु ण पॅसेंजर गाड्यांच्या ३६ फेºया रद्द झाल्या आहे. मात्र, २० एप्रिलशनिवारपासून दोन पॅसेंजर गाड्या प्रारंभ झाल्यात. अद्यापही पॅसेंजरच्या ३२ फेºया सुरू होणे बाकी आहे. यात भुसावळ- नागपूर, भुसावळ - बल्लारशा, मुंबई-भुसावळ, मुंबई-भुसावळ-नागपूर दरम्यान धावणाºया जवळपास पॅसेंजर गाड्यांच्या समावेश आहे.
दोन पॅसेंजर गाड्यांना प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:56 AM
भुसावळ रेल्वे येथे विविध विकास कामांसाठी ५ ते २० एप्रिल दरम्यान बहुतांश रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे विभागाने घेतला होता. त्यामुळे नागपूर- भुसावळ लोह मार्गावरील सर्वच पॅसेंजर गाड्या रद्द केल्यात.
ठळक मुद्देमेगा ब्लॉक शिथिल : रद्द मेल, एक्स्प्रेसबाबत निर्णय नाही