लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव बारी : पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या अंजनगाव बारीला भिवापूर तलावातून पाणीपुरवठा सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांना सादर निवेदनात ग्रामस्थांनी दिला आहे.अंजनगाव बारी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी योजना मंजूर करावी, यासाठी येथील सरपंच, सदस्य व नागरिकांनी आ. रवि राणा यांना निवेदन दिले होते. त्यानुसार आठ कोटी रुपयांची जलस्वराज्य-२ ही योजना मंजूर करण्यात आली. यासाठी वनविभागाने भिवापूर तलावातून अंजनगावला पाणी पुरविण्यासाठी पाइपलाइन टाकण्यास मंजुरी दिली. परंतु, काही दिवस काम झाल्यानंतर वनविभागाने ते बंद पाडले. हेमंत मिणा यांची भेट घेतली असता, त्यांनी नव्याने परवानगी घेण्यास बजावले. म.जी.प्रा.ने नव्याने परवानगी मागितली व त्वरित काम सुरू करण्याचे आदेश वनविभागाने द्यावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. यावेळी सुनील राणा, मीनल डकरे आदी उपस्थित होते.
भिवापूर तलावातून पाणीपुरवठा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:33 AM
पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या अंजनगाव बारीला भिवापूर तलावातून पाणीपुरवठा सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांना सादर निवेदनात ग्रामस्थांनी दिला आहे.
ठळक मुद्देडीएसओंना निवेदन : तीव्र आंदोलनाचा इशारा