शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

सखी मंच नोंदणीस ४ फेब्रुवारीपासून प्रारंभ

By admin | Published: February 01, 2017 12:12 AM

महिलांच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, ..

नोंदणी करताच मिळणार हजारोंची आकर्षक बक्षिसे : मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेलअमरावती : महिलांच्या कलागुणांना संधी मिळावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांचे मनोरंजन व्हावे, या हेतूने लोकमत सखी मंचच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्या तीन लाख सदस्यांचे व्यासपीठ मागील सतत १८ वर्षांपासून सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सन २०१६ या वर्षांत अमरावती शहरात एकूण ६० पेक्षाही अधिक कौतुक सोहळे, स्नेहमेळावे ऋणानुबंध घट्ट करणारे अनेक उपक्रम घेण्यात आलेत. आवडत्या गोष्टी, आवडते कार्यक्रम, आवडते गिफ्ट यामाध्यमातून सखी मंच परिवार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दरवर्षी हजारो महिला या उपक्रमाचा व कार्यक्रमांचा आनंद घेतात. दरवर्षी नवनवीन सदस्य या कुटुंबात सामील होतात. यंदाही या अनोख्या व्यासपीठाची सदस्य नोंदणी अमरावती शहरात ४ व ५ फेब्रुवारी रोजी १३ पेक्षाही अधिक केंद्रांवर सुरू राहणार आहे. सदस्य नोंदणी करताच वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमाची पर्वणी तर मिळणारच आहे. पण, त्याशिवाय हजारोंची आकर्षक तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या भरपूर साऱ्या भेटवस्तूदेखील मिळणार आहेत. यावर्षी नोंदणीसाठी शहरातील १३ केंद्रांवर नोंदणी सुविधा उपलब्ध राहील. सदस्यांना नोंदणीनंतर आकर्षक बक्षिसे दिली जातील. यामध्ये ५४० रूपये किमतीचे फ्राय पॅन, ओळखपत्र, ३१४० रूपयाचे मोफत कुपन, १ लाख रूपये किमतीचे विमा संरक्षण, वाचनीय पुस्तक, गोल्डन धमाका योजना आणि वार्षिक भाग्यवंत सोडत या योजनादेखील लागू होणार आहेत. शिवाय यावर्षी राज्यस्तरावर ५१ महिलांना विमानाद्वारे हवाई सफरीचे भाग्यवंत सोडत काढून लाभ देण्यात येईल.प्रत्येक सखीला ३,१४० रूपयांचे जे कुपन मिळणार आहेत त्यात २५० रूपयांची शाही दिल्ली दरबार थाली सखींना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोफत, तसेच राजनंदिनी साडीजकडून विशेष उपहार व इतर भरपूर सुविधा महिलांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यात १ लाख ५० हजार किमतीची गोल्डन धमाका योजना आराधना साडी सेंटरकडून, नेहमीप्रमाणे विभागीय सोडतीचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. यात १ लाख २५ हजार रूपयांची विविध बक्षिसे असणार आहेत. सन २०१७ मध्येसुद्धा बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सखींनी विविध स्पर्धा, कार्यशाळा, सांस्कृतिक, साहित्यिक, कलाविष्कार, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी तत्काळ लोकमत भवन येथे ४ व ५ फेब्रुवारीपासून नावनोंदणी करावी. शहरी भागासाठी ५०० रूपये भरून सदस्य नोंदणी करता येईल, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोकमत भवन, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे स्वाती बडगुजर यांच्याशी (९८५०३०४०८७, ९९२२४२७७९४) या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)शहरात येथेही होणार सदस्यता नोंदणीरोहिणी कुंटे (९४०५४७७३६४), कमिश्नर कॉलनी, कॅम्परजनी वानखडे (९६३७०४५०५३), प्रवीणनगर, गणेशपेठसरोदे आॅप्टिकल (९६२३६०३८८९), काँग्रेसनगर रोडअरूणा राऊत (९५२७५५५०७७), गजानन कॉलनी, रंगोली लॉनच्या मागे, कठोरा रोडअर्चना देशमुख (८३२९५०१०२०), पार्वतीनगर नं. १, अकोली रोडवैशाली कोटांगळे (९०२१९५७०९०), आनंद विहार कॉलनी, विद्युतनगरज्योती नाखले (९४०३०५१५९७), व्यंकटेश कॉलनी, वडाळीअरूणा इंगोले (९५२७५५५०७७), प्रिया टाऊनशिप, गणपती मंदिराजवळमंजू मांजरे - दत्तविहार कॉलनी, सत्कार स्वीटनजीक, अकोली रोडस्वाती माळोदे (९४२३६२१८४०), बडनेरा बसस्थानकाशेजारी अलंकार पार्क