उपोषणाचा इशारा : सहा महिन्यांपासून ससेहोलपटपरतवाडा : येथील अल्पभूधारक शेतकऱ्याला स्टेट बँकेच्या कृषी शाखेच्या उद्धट वागणुकीचा सामना मागील सहा महिन्यांपासून करावा लागत आहे. ३५ हजारांचा धनादेश बँकेने हरविला. परिणामी अल्पभूधारक शेतकरी लाभापासून वंचित राहिले. त्यामुळे त्यांनी अखेर उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रवीण तेलगोट (रा.परतवाडा) अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नाव असून त्यांनी २ जानेवारी २०१६ रोजी परतवाडा येथील स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेत ३५ हजार रुपंयाचा धनादेश त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी दिला होता. मात्र पाच महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा धनादेशाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. यादरम्यान त्यांनी अनेकदा बँकेत जाऊन सदर प्रकाराची चौकशी केली, मात्र परतवाडा शाखेतील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना अत्यंत बेजाबदारीचे उत्तर देऊन हीन दर्जाची वागणूक दिली. प्रवीण तेलगोट यांनी स्वारस्वत: बँक चेंबूर येथील शाखेचा धनादेश दिला होता. त्यांच्या बँक खात्यामध्ये सदर धनादेश जमा न झाल्याने तेलगोटे पीककर्जाची परतफेड करू शकले नाहीत. परिणामी ते थकबाकीदार राहिलेत. उलट बँकेने त्यांच्या पूर्वीच्या कर्जावर व्याज आकारणी करून नवीन कर्ज देण्यास नकार दिल्याची तक्रार त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)उपोषणाचा इशारा'माझा धनादेश माझ्या खात्यात जमा करा, त्यावर व्याज द्या, पीक कर्ज द्या व माझा झालेल्या अपमानाची माफी मागा, अन्यथा परिवारासह उपोषण करू' असा इशारा तेलगोटे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.उद्धत वागणूक, उत्तर नाहीपेरणीसाठी आवश्यक पीककर्ज मिळावे व आपल्या धनादेशाचे काम यासाठी शाखेत वारंवार जाऊन लेखीपत्र दिले. अमरावती मुख्य शाखेत तक्रार दिली. मात्र मागील सहा महिन्यांत त्यांना एकाही पत्राचे उत्तर न देता बँकेच्या स्थायी अधिकाऱ्यांनी अक्षरश: बँकेतून हकलून लावले. परिणामी त्यांना मन:स्ताप सहन करावा लागला. बळीराजा पीक कर्जापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. मात्र या अधिकाऱ्यांमुळे एका अल्पभूधारक शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली, हे विशेष.
कृषी स्टेट बँकेने हरविला धनादेश
By admin | Published: June 11, 2016 12:16 AM