शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

बडनेऱ्यात नव्या जलकुंभ उद्घाटनाचे राजकीय नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:03 PM

बडनेरा जुनिवस्तीस्थित नव्याने साकारलेल्या जलकुंभाचे रविवारी दोनदा नाट्यमय उद्घाटन झाले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात दुपारी पेढे भरविले, तर आ.रवि राणा यांनी जल्लोषात सायंकाळी जलकुंभ रीतसर सुरू झाल्याची घोषणा केली.

ठळक मुद्देएकाच दिवशी दोनवेळा आनंदोत्सव : युवा स्वाभिमानचा जल्लोष; भाजपने भरविले पेढे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा जुनिवस्तीस्थित नव्याने साकारलेल्या जलकुंभाचे रविवारी दोनदा नाट्यमय उद्घाटन झाले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात दुपारी पेढे भरविले, तर आ.रवि राणा यांनी जल्लोषात सायंकाळी जलकुंभ रीतसर सुरू झाल्याची घोषणा केली.जुनीवस्ती येथील जलकुंभाचे आयुर्मान संपुष्टात आल्यामुळे त्याच जागी शासन निधीतून नव्याने जलकुंभ साकारण्यात आले आहे. या जलकुंभाचे बांधकाम सुरू असताना बडनेरावासीयांना नवीवस्ती येथील जलकुंभातून पाणीपुरवठा व्हायचा. त्यामुळे गत सहा महिन्यांपासून पाण्याचे नियोजन कोलमडले. दरम्यान संतप्त नागरिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर धडक दिली. दररोज पाणी देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.पाणी वितरण सुलभमजीप्राचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनी २० मे रोजी बडनेरा येथील नवनिर्मित जलकुंभ सुरू केले जाईल, अशी ग्वाही युवा स्वाभिमानच्या आंदोलनकर्त्यांना दिली होती. त्याअनुषंगाने मजीप्राने रविवारी जलकुंभ सुरू करण्याचे नियोजन चालविले. तत्पूर्वी भाजप, सेना, रिपाइंचे कार्यकर्ते जलकुंभ परिसरात पोहचले. शिवराय कुळकर्णी यांनी जलकुंभ निर्मितीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. अमृत योजनेतून जलकुंभाचे बांधकाम पूर्णत्वास येऊन पाणी वितरणासाठी टाकी सज्ज झाल्याने भाजपने पेढे भरविले. मुख्यमंत्र्यांनीच जलकुंभाचे उद्घाटन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी रिपाइंचे नगरसेवक प्रकाश बनसोड, शिवसेनेचे नगरसेवक ललित झंझाड, नगरसेविका गंगा अंभोरे, संदीप अंबाडकर, किरण अंबाडकर, मुकेश उसरे आदी उपस्थित होते.दरम्यान सायंकाळी ५ वाजतादरम्यान आ. रवि राणा यांच्या नेतृत्वात जलकुंभाचे रितसर उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी ‘जल है तो कलम है’ अशा घोषणा देत पाण्याचे महत्व सांगण्यात आले. दरम्यान कार्यकर्त्यांनी आ. राणांच्या वचनपूर्तीबद्दल जल्लोष केला. हे जलकुंभ २० लक्ष रूपये खर्चून उभारण्यात आलेले असून, नाविण्यपूर्ण योजनेतून ते पूर्णत्वास आल्याची माहिती आ. राणा यांनी दिली.यावेळी आ. रवि राणा यांच्यासह नगरसेविका सुमती ढोके, बळीराम ग्रेसपुंजे, अजय मोरय्या, अयूब खान, नीळकंठ कात्रे, नितीन मोहोड, लईक पटेल, विलास वाडेकर, नील निखार, मंगेश चव्हाण, सिद्धार्थ बनसोड, जावेद मेमन, किशोर अंबाडकर, नगरसेवक मो. साबीर, सादीक अली, रऊप पटेल, वसे गुरूजी, कमरूद्दीन, अमोल मिलखे आदी उपस्थित होते. यावेळी मजीप्राचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, उपअभियंता किशोर रघुवंशी, अविनासे आदींनी हजेरी लावली होती. आ. राणांच्या हस्ते जलकुंभाचे उद्घाटन केल्यानंतर सायंकाळी ७ वाजता जलकुंभातून पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे गत सहा महिन्यापासून पाणी पुरवठ्याचे कोलमडलेले नियोजन पूर्ववत होणार आहे. रमजान महिना प्रारंभ होताच जलकुंभातून पाणी पुरवठा सुरू झाल्याने बडनेरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.