शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
2
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
3
"उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट
4
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
5
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
7
दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...  
8
भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...
9
Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?
10
अजित पवारांच्या बड्या नेत्याला विनातिकीट ठाकरे गटात प्रवेश; कोकणात मोठा धक्का
11
दिल्लीसह देशातील सर्व CRPF शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
12
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
13
Astro Tips: 'या' राशीची बायको मिळाली तर मित्रही तुमच्या नशिबाचा हेवा करतील!
14
BSNL ची नवी सुरुवात; नवा LOGO पाहिलात का? सोबतच ७ नव्या सेवा, हाय स्पीड इंटरनेटही
15
Sukesh Chandrashekar : "४८ तासांत रोख रक्कम..."; सुकेश चंद्रशेखरची करण जोहरला मोठी ऑफर, जॅकलिनचंही घेतलं नाव
16
परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई
17
"माझ्याविरोधात मोदी, शाहांच्या सभा घ्या, मला आघाडी वाढवायला मदत होईल’’, रोहित पवारांचा टोला 
18
60 वर्षांचे झाले अमित शाह; किती आहे त्यांची नेटवर्थ अन् कोणकोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक? जाणून घ्या
19
Diwali 2024: दिवाळीत घरच नाही तर अंगण-उंबरठाही स्वच्छ ठेवा; तेच असते लक्ष्मीचे प्रवेशद्वार!
20
७ लाख रुपयांचा जीवन विमा तीन वर्षांसाठी मिळेल मोफत; EPFO ​​ने १२ महिने सतत सेवेची अटही हटवली

राज्य महामार्ग ठरतोय कर्दनकाळ

By admin | Published: September 13, 2015 12:12 AM

अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहराच्या मधातून गेलेल्या राज्य महामार्ग नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.

अचलपूर : अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहराच्या मधातून गेलेल्या राज्य महामार्ग नागरिकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. हा मार्ग शहराबाहेरून बायपास काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. चंद्रपूर भुगूस ते अमरावती व्हाया परतवाडा ते भोकरबर्डी असा २१६ किलोमिटर लांबीचा हा राज्यमहामार्ग क्रमांक १४ आहे. अमरावती ते भोकरबर्डीपर्यंत साधारण १२९ किलोमीटर लांब आहे. हा महामार्ग भोकरबर्डीपासून पुढे मध्यप्रदेश ते बऱ्हाणपूरपर्यंत जातो. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक राहते. मोठ-मोठी जड वाहने या रस्त्यावरून धावतात. अचलपूर नाका ते चिखलदरा स्टॉपपर्यंत हा मार्ग दुचाकीस्वार, विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक यांच्यासह आदींसाठी कर्दनकाळ ठरत आहे. दररोज लहान मोठे अपघात ठरलेले असतात. यापूर्वी अपघातात ठार झाल्याच्या घटनाही या रस्त्यावर घडल्या आहेत. मोकाट जनावरांनाही वाहनांची धडक बसून गंभीर जखमी झाल्याची उदाहरणे असून प्रसंगी जीवही गेले आहेत. अचलपूर नाक्यापासून चिखलदरा स्टॉपपर्यंत याचे अंतर साधारणत: ७ ते ८ किलोमिटर असू शकते. यादरम्यान हातगाडीवाले, पानटपरी, चहा कॅन्टींगवाले आदींनी अतिक्रमण केले आहे. निवासी रस्ता अरुंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमणधारकांना बऱ्याच वेळा नोटीस देण्यात आल्यात. दोनतीन वेळा अतिक्रमण काढण्यात आले. पण काही दिवसांनी ते ‘जैसे थे’ होते. काही बडे दुकानदार आपल्या दुकानातील विक्रीचा माल दुकानाबाहेर रस्त्यालगत आणून ठेवतात. तसेच दुकानदारांना पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्यावरुच खेटून ग्राहकांची वाहने उभी असतात. बऱ्याचदा वाहने रस्त्यावर उभी असताना पोलीस बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे मूळ रस्त्याची रुंदी कमी होते. वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागते. (शहर प्रतिनिधी)