अमरावती - औरंगाबाद येथे राज्यस्तर सबज्युनियर, ज्युनियर, सिनीयर मुले, मुली स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा २२ ते २३ जून रोजी पार पडली. यामध्ये अमरावतीतील खेळाडूंनी २८ पदके प्राप्त केली. यामध्ये अमरावतीतील खेळाडूंची संख्या सवाधिक होती. २२ जूनला अमरावती संघाने रिपोर्टींग केली व दुसºया दिवशी १३ वर्षाखालील मुलींनी कांस्यपदक पटकावले. या संघात कनक गुप्ता, देवयाणी सुफले, मेहेर पाटील यांचा समावेश होता. १५ वर्षांखालील वयोगटातील मुलींनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून कांस्यपदक मिळविले. यामध्ये तनिशा सोनार, देव्यांशी बुटे, जान्हवी भुजाडे यांचा समावेश होता. १७ वर्षाखालील मुलींनी अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. या संघात संस्कृती उमक, मंजिरी खुळे, सेजल वानखडे या खेळाडूंनी रौप्यपदक प्राप्त केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अमरावती संघाच्या पदरी मुला-मुलींनी एकूण २९ पदक संघप्रकारात मिळविले. स्पर्धेच्या अंतिम दिवशी २४ जून रोजी ११ वर्षाखालील मुले वैयक्तिक गटामध्ये स्वीकृत राऊत व खेळाडूने कांस्यपदक मिळवले. स्क्वॅश खेळामध्ये मुंबई, पुणे, ठाणे या शहराचे आधीपासून वर्चस्व आले आहे. पण या वर्षीच्या स्पर्धेमध्ये अमरावतीने आपला एक नवीन अस्तित्व निर्माण करून या शहराचे वर्चस्व काही गटामध्ये मोडून काढले. अमरावतीच्या संघाला ही पहिलीच वेळ आहे. पदकाचा पाऊस खेळाडूंनी अमरावतीकरांना दिला. या स्पर्धेमध्ये संघगटात एक सुवर्णपदक, तीन रौप्यपदक, सहा कांस्यपदक व वैयक्तिक गटात एक सुवर्ण, दोन रौप्य, दोन कांस्यपदक अशा २८ पदकांची कमाई केली.
राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत अमरावतीतील २८ पदके
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 5:29 PM