शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

विदर्भात पाणवठ्यांवर ‘जागते रहो’, व्याघ्र प्रकल्पांवर तस्करांची नजर; राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून सूचना

By गणेश वासनिक | Published: March 09, 2024 7:03 PM

‘लिट्मस’ पेपरचा नियमित करा वापर; नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर वन कर्मचारी तैनात

अमरावती : उन्हाळ्यात वाघांना तृष्णा भागविण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागते. नेमकी हीच बाब हेरून व्याघ्र तस्कर हे वाघांच्या शिकारीसाठी सज्ज होत असतात. विशेषत: एप्रिल, मे महिन्यात व्याघ्र प्रकल्पात पाणवठ्यांवर वाघांच्या विषप्रयोगाची भीती असून, विदर्भातील वन कर्मचाऱ्यांना ‘जागते रहो’च्या सूचना राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालक ‘अलर्ट’ झाले आहेत.

व्याघ्र तस्करांकडून वाघांच्या शिकारीसाठी जंगलात लोखंडी ट्रॅप लावणे, पाणवठ्यावर विषप्रयोेग करण्याच्या घटना यापूर्वी निदर्शनास आल्या आहेत. तस्करांची ही मोहीम फत्ते झाल्यास वाघांच्या विविध अवयवांची आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री केली जाते. दिल्ली, नेपाळ मार्गे चीनपर्यंत व्याघ्र तस्करीचे कनेक्शन असल्याचे दिल्ली येथील वन्यजीव नियंत्रण ब्युरोने यापूर्वीच उघडकीस आणले आहे. विदर्भातील वाघांवर मध्य प्रदेशातील बहेलिया, तर पंजाबच्या बावरिया टोळ्यांचे लक्ष आहे. त्यामुळे विदर्भातील मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर, टिपेश्वर या अभयारण्यानजीकच्या गावांमध्ये संशयास्पद अथवा परप्रांतीय व्यक्ती दिसल्यास स्थानिक पोलिसांना तत्काळ माहिती देण्याच्या सूचना व्याघ्र प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याची विश्वसनीय माहिती आहे. गतवर्षी २७ जून २०२३ रोजी गडचिरोलीनजकीच्या आंबेशिवणी येथे व्याघ्र शिकारीच्या साहित्यासह संशयित सहा पुरुष, पाच महिला, पाच लहान मुलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, हे विशेष....‘त्या’ पाणवठ्यांवर टँकरने पाणीपुरवठा

व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यात पाणी समस्या उद्भवल्यास प्रसंगी टँकरने पाणीपुरवठा करावा, असे निर्देश वन्यजीव विभागाच्या वरिष्ठांनी दिले आहेत. सोलर नसलेल्या पाणवठ्यावर वाघांची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे. पाण्याअभावी वन्यप्राण्यांचे मृत्यू होता कामा नयेत, अशी गाइडलाइन आहे. पाणवठ्यांच्या नियमित तपासणीसाठी लिट्मस पेपरचा वापर अनिवार्य केला आहे, तर नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर वनकर्मचारी तैनात करण्याच्या सूचना आहेत.पाणवठ्यांची लिटमस पेपरने नियमित तपासणी केली जाते; मात्र उन्हाळ्यात याविषयी विशेष काळजी घेतली जाते. ज्या ठिकाणी सोलर वीज उपलब्ध नाही, अशा पाणवठ्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणवठ्यांची देखभाल, तपासणीसाठी बीटनिहाय वनकर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. - मनोजकुमार खैरनार, उपवनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्राईम सेल.

टॅग्स :Amravatiअमरावती