लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इर्विन चौकातील लॉजवर राहून दोन सराइतांनी लॉजखालीच असणाऱ्या जलेबीवाला प्रतिष्ठानसह घराची रेकी केली. त्यानंतर जमील कॉलनीतील घरी घरफोडी करून १३ लाख २५ हजारांची रोख लंपास केली. या प्रकरणातील दोन आरोपींना चार महिन्यानंतर अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना बुधवारी यश मिळाले.पोलीस सूत्रानुसार, गणेश रामदीन साहू (४८, रा. रतनगंज) व जियाउल्ला खान वल्द किस्मतउल्ला खान (५२, दोन्ही रा. रहमतनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून रोख सात हजार जप्त केले आहेत. १४ जुलै २०१८ रोजी जलेबीवाल्याच्या घरी चोरी झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक तपास कामी लागले होते. या गुन्ह्यात आरोपी गणेश साहू व जियाउल्ला खान यांचा सहभाग असल्याची भनक पोलिसांना लागली होती. ते सिटी लॉजमध्ये राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी बुधवारी दोन्ही आरोपींना अटक केली. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, उपनिरीक्षक राम गित्ते, सहायक उपनिरीक्षक विनोद गाडेकर, सुधीर गुडधे, विजय पेठे, प्रकाश जगताप, जावेद अहमद, अजय मिश्रा, शेख सुलतान, प्रवीण सूर्यवंशी आदींनी गुन्हा उघड करण्यात परिश्रम घेतले.१४ जुलै २०१८ रोजी घरफोडीजिलेबी व्यावसायिक अबरारउल हक वल्द मोहम्मद इब्राहिम (२८ रा. बºहाणपूर, मध्य प्रदेश) हे जमील कॉलनी येथील रहिवासी नूरजहाँ बेगम मोहम्मद अकील बेग यांच्याकडे भाड्याने राहतात. १४ जुलै २०१८ रोजी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले असता, त्यांना खोलीच्या दाराचे कुलूप तोडून चोरांनी कपाटातील १३ लाख २५ हजारांची रोख लंपास केल्याचे आढळले. त्यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.अशी केली रेकीइर्विन चौकातील बऱ्हाणपूर जलेबी या प्रतिष्ठानाच्या वरच महाराजा लॉज आहे. आरोपींनी तेथील खोलीत काही दिवस वास्तव्य केले. तेथे राहून आरोपींनी अबरारउल हक यांच्यावर पाळत ठेवली. अबरारउल हक यांचा मागोवा घेत त्यांच्या घरापर्यंत पाठलागही केला. अबरारउल हक यांची दिनचर्या लक्षात घेऊन १४ जुलै रोजी सायंकाळी आरोपी गणेश साहूने साथीदार जियाउल्ला खानच्या मदतीने घरफोडी केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.आरोपी वऱ्हाडांना लुटण्यात तरबेजशहरातील लॉज राहून रेकी केल्यानंतर वेळ पाहून घरफोडी करण्यात दोन्ही आरोपी तरबेज आहेत. जलेबीवाले यांच्याकडील घरफोडीत मुख्य सूत्रधार गणेश याने साथीदार जियाउल्ला खान याला १ लाख २५ हजार रुपये दिले होते. हे दोघे लॉजवर राहून व्यापारी व मंगल कार्यालयातील वºहाडींवर लक्ष ठेवत. यानंतर त्यांना लुटत असल्याची बाब पोलीस तपासात पुढे आली आहे.
लॉजवर राहून रेकी अन् जलेबीवाल्याच्या घरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:57 PM
इर्विन चौकातील लॉजवर राहून दोन सराइतांनी लॉजखालीच असणाऱ्या जलेबीवाला प्रतिष्ठानसह घराची रेकी केली. त्यानंतर जमील कॉलनीतील घरी घरफोडी करून १३ लाख २५ हजारांची रोख लंपास केली. या प्रकरणातील दोन आरोपींना चार महिन्यानंतर अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना बुधवारी यश मिळाले.
ठळक मुद्देचार महिन्यानंतर दोन आरोपी अटकेत : १३ लाखांच्या घरफोडीची कबुली; गुन्हे शाखेने लावला छडा