आॅनलाईन लोकमतअमरावती : शाळेतील बहुतांश मुले दुचाकीनेच येतात. आपल्याकडे ती नसल्यामुळे मुली लक्ष देत नाहीत, अशी खंत बाळगणाऱ्या एका अल्पवयीनाने त्यावर उपाय म्हणून दुचाकी चोरली आणि पोलिसांच्या क्राइम डायरीमध्ये आपल्या नावाची नोंद करून घेतली. फे्रजरपुरा हद्दीतून या अल्पवयीनास गाडगेनगर पोलिसांनी २७ नोव्हेंबरला ताब्यात घेतले होते. दुचाकीचोरीची तक्रार सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसांकडे नोंदविण्यात आली आहे.दहावीत शिकणाºया १५ वर्षीय अल्पवयीनाने फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील मालटेकडी परिसरातून २७ नोव्हेंबर रोजी दुचाकी चोरली. त्या दुचाकीवरील नंबर प्लेट त्याने काढली आणि शहरात बिनधास्त दुचाकी फिरवू लागला. गाडगेनगर पोलिसांनी विनाक्रमाकांची ही दुचाकी पकडून चौकशी केली असता, फे्रजरपुरा हद्दीतून चोरल्याचे उघड झाले.वडील दुचाकीने आॅफिसला जातात. कुठल्याही कामासाठी लगेच दुचाकी काढतात. मात्र, आपल्याला चालविण्यास मनाई करतात. शाळेतील मुले व मित्र दुचाकीने येतात. त्यांच्या दुचाकीवर मुली बसून जातात. मात्र, आपल्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही, ही बाब त्याच्या मनात घर करून बसली होती. यामुळे त्याने दुचाकीचा चोरण्याचा बेत आखला. तो मालटेकडीजवळ आला आणि हॅन्डल लॉक नसलेली दुचाकी पळविली.गाडगेनगर पोलिसांना हा प्रकार त्या अल्पवयीनाने सांगितला. तो अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याच्या वडिलांना बोलावून समजपत्र दिले तसेच चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.फे्रजरपुरा हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीनास गाडगेनगर हद्दीत पकडण्यात आले. शाळेतील मित्र दुचाकीनेच येतात. वडील दुचाकी देत नाहीत. मुली बघत नाहीत, त्यांना इम्प्रेस करण्यासाठी दुचाकीचोरी केल्याची कबुली त्याने दिली.- मनीष ठाकरे, ठाणेदार
मुलींना 'इम्प्रेस' करण्यासाठी त्याने चोरली दुचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 11:33 PM
आॅनलाईन लोकमतअमरावती : शाळेतील बहुतांश मुले दुचाकीनेच येतात. आपल्याकडे ती नसल्यामुळे मुली लक्ष देत नाहीत, अशी खंत बाळगणाऱ्या एका अल्पवयीनाने त्यावर उपाय म्हणून दुचाकी चोरली आणि पोलिसांच्या क्राइम डायरीमध्ये आपल्या नावाची नोंद करून घेतली. फे्रजरपुरा हद्दीतून या अल्पवयीनास गाडगेनगर पोलिसांनी २७ नोव्हेंबरला ताब्यात घेतले होते. दुचाकीचोरीची तक्रार सोमवारी फ्रेजरपुरा पोलिसांकडे ...
ठळक मुद्देअल्पवयीन चोर : गाडगेनगर पोलिसांनी पकडले, पालकांना समजपत्र