मोर्शी येथील राजेश किसन पेठे व मंगेश संतोष नागपुरे असे त्या युवकाचे नाव असून ते भिवकुंडी येथे नेहमीप्रमाणे कामावर जात असताना त्यांना पाळा मार्गावरील रेल्वे रुळानजीक लहान पर्स दिसली. त्यांनी ती उघडली असता, त्यात सोन्याचे दागिने व रोख आढळून आली. याची माहिती गजानन हिरुळकर यांना दिली. हिरुळकर यांनी लगेच पोलीस ठाणे गाठून ती पर्स पत्रकार शेखर चौधरी, अजय पाटील, संजय ऊल्हे यांच्या उपस्थितीत नव्याने रुजू झालेले मोर्शीचे पोलीस निरीक्षक एल.के. मोहंडुळे यांना सुपूर्द केली. त्यात रोख रक्कम ४९०० रुपये, एक मंगळसूत्र व एक चेन, आधारकार्ड, इलेक्शन कार्ड दिसून आले.
आधार कार्डवर सरला विजय बहुरूपी (रा. पिंपळखुटा लहान पो. निंभी) असा पत्ता आहे. दोन महिन्यापूर्वी ग्रामीण भागातील दापोरी येथील वृक्षलागवडीसाठी जाणाऱ्या युवकांना १ लाख ९० हजार रुपये रोख सापडले होते. त्यांनी ती रक्कम तत्कालीन ठाणेदार संजय सोळंके यांना सुपूर्द केली होती, हे येथे उल्लेखनीय.