(फोटो आहे)
चांदूर रेल्वे : कोरोना काळात एकीकडे मद्यविक्रीची दुकाने बंद असताना अवैध पद्धतीने दारूची विक्री ग्रामीण भागात जोर धरत आहे. आमला विश्वेश्वर येथील कारवाईनंतर घरून देशी दारू विकणाऱ्या मालखेड येथील एकावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाने धाड टाकून देशी दारूचा साठा जप्त केला.
माहितीनुसार कोरोना काळात देशी व इतर मद्यविक्रीला विशिष्ट नियमात विकण्याची परवानगी आहे. असे असताना मालखेड येथील संशयित आरोपी क्रिष्णा पाटील याने त्याच्या घरातील बाथरूममध्ये ८७ देशी दारूच्या पावट्या ठेवल्याचे दिसून आले. संशयावरून उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक पोलिसांनी धाड टाकून कारवाई ही केली. आरोपीला अटक करून समजपत्रावर सोडण्यात आले. सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांच्यासह पोलीस शिपाई मनोज धोटे, योगेश कडुकार, नरेश मेश्राम, पवन भांबुरकर, अरुण भुरकाडे, शारदा मडघे आदी कारवाईत सहभागी होते.