शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
3
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
6
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
7
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
8
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
11
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
12
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
14
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
15
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
16
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
17
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
18
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
19
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
20
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती

दगडफेक प्रकरण; अटकेतील आरोपींची संख्या ३३ वर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:05 AM

Amravati : 'तो' व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध आयटी अॅक्ट अन्वये गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : नागपुरी गेट पोलिस ठाण्यावर विशिष्टधर्मिय जमावाने ४ ऑक्टोबर रोजी रात्री तुफान दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली होती. त्यात २१ पोलिस अधिकारी कर्मचारी जखमीदेखील झाले होते. या प्रकरणात आतापर्यंत ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणातील अन्य आरोपींचा कसून शोध सुरू आहे. त्यासाठी नागपुरी गेट पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके काम करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी बुधवारी दिली. 

शुक्रवारी रात्री दगडफेक व तोडफोडीची घडल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली होती. त्यानंतर व्हायरल व्हिडीओ व ठाण्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांची धरपकड सुरू केली. त्यानुसार, शनिवार ५ ऑक्टोबर व रविवार, ६ ऑक्टोबर या दोन दिवसांत पोलिसांनी २२ आरोपींना अटक केली. त्यानंतर या प्रकरणात आणखी १० आरोपींना अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची अटक संख्या ३३ वर पोहोचली आहे. पैकी २४ आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा कसून शोध सुरू असल्याची माहिती सीपी रेड्डी यांनी बुधवारी दिली. 

कट करून जमावाला भडकविले उत्तर प्रदेशातील गाजियाबादस्थित दासनादेवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांची ओळख पटविण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आरोपींनी ते व्हिडीओ व्हायरल करून लोकांना भडकविण्याचे कृत्य केले. त्यामुळे या घटनेच्या गुन्ह्यात आयटी अॅक्ट अन्वये कलम वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या स्थानिकांसोबतच बाहेरच्या व्यक्तींचीही ओळख पटविल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी