मांजरखेड : चांदूर रेल्वे तालुक्यातील वीज बिल वसुली थांबिवण्याची मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने तहसीलदारांकडे केली. यावेळी सुरेंद्र खेरडे, बाबाराव जाधव, दीपक शंभरकर, नंदकिशोर देशमुख, सुरेश काबळे, श्रीकृष्ण मते, प्रेमचंद अबादी उपस्थित होते.
----------
वकनाथ येथे घरफोडी
तळेगाव दशासर : नजीकच्या वकनाथ येथे बंद घर फोडून ऐवज लंपास करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी राजेश उद्धवराव लामसोगे यांच्या तक्रारीवरून मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी नदीम शेख , शिलाजित ब्रह्माजी कांबळे (२२) व तेजस ब्रह्माजी कांबळे (२०) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४५७, ५११, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.
--------------
गुरे चारण्यावरून मारहाण
चांदूर रेल्वे : शेताच्या धु०यापर्यंत गुरे चराई करीत आल्याच्या रागातून बादल केशरवाणी (रा. चांदूर रेल्वे) याने नगरसेन मुला खोब्रागडे यांना शिवीगाळ व हातातील काठीने मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
----------
तळेगाव दशासर येथे महिलेचा छळ
तळेगाव दशासर : येथील आशिष अण्णाजी पाटील (४५) याच्याविरुद्ध पत्नीने छळाची तक्रार तळेगाव पोलिसांत दाखल केली आहे. मुलगा होत नसल्याने दोन मुलींना घेऊन निघून जा, अशी धमकी मिळत असल्याचे तिने नमूद केले. पोलिसांनी भादंविचे कलम ४९८ अ, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला.
-------------
खांबोरा गावानजीक रेती पकडली
अचलपूर : तालुक्यातील शिंदी मार्गावर खांबोरा गावानजीक विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर सरमसपुरा पोलिसांनी पकडला. याप्रकरणी करण कैलासराव पवार (रा. देवरी) व योगेश पंजाबराव श्रीनाथ (रा. शिंदी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
--
घरझडती घेताना शासकीय कामकाजात अडथळा
शिरजगाव कसबा : दारूविक्रीबाबत गोपनीय माहितीवरून घरझडती घेण्यासाठी आलेल्या स्थानिक पोलिसांना अडथळा निर्माण केल्याबद्दल लाखनवाडी येथील रत्ना दिलीप वानखडे व आशिष दिलीप वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. १६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.
----------