३९ नागरिक "डिटेन" : भातकुली तहसील स्थानांतरणाला विरोधलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील भातकुली तहसील स्थानांतरणाचा मुद्दा आता तापला असून शनिवारी नागरिकांनी वलगाव ते परतवाडा मार्गावर रास्ता रोको करून प्रशासनाला वेठीस धरले होते. या आंदोलनामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी ३९ आंदोलनकर्त्यांना डिटेन करून ठाण्यात नेले. भातकुली तालुक्यातील ७० टक्के ग्रामपंचायतींचा तहसील कार्यालयात स्थानांतरणाला विरोध असताना ३० टक्केच ग्रामपंचायतींच्या भागात तहसील नेण्याचा घाट रचला जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. हे तहसील कार्यालय अमरावतीतच सोयीस्कर आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाचे स्थानांतरण करू नये, अशी मागणी गावकऱ्यांनी प्रशासनाकडे रेटून धरली. यासंदर्भात शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर नागरिकांनी धडक दिली. स्थानांतरणाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली.
परतवाडा मार्गावर रास्ता रोको
By admin | Published: June 18, 2017 12:05 AM