शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

कृषी पतपुरवठा निकषात धोरणात्मक बदल हवा, शेतकरी मिशन आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 6:30 PM

राज्य शासनाद्वारा राबविण्यात येत असलेल्या अनेक योजनांचा लाभ तरी ख-या व गरजू शेतकºयांपर्यंत पोहोचतच नाही. कृषी पतपुरवठ्यातदेखील निकष जाचक असल्याने शेतक-यांना लाभ न होता कर्ज वाढतच आहे. राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा चिंता व्यक्त केली आहे.

अमरावती - राज्य शासनाद्वारा राबविण्यात येत असलेल्या अनेक योजनांचा लाभ तरी खºया व गरजू शेतकºयांपर्यंत पोहोचतच नाही. कृषी पतपुरवठ्यातदेखील निकष जाचक असल्याने शेतक-यांना लाभ न होता कर्ज वाढतच आहे. राज्यात १३ जिल्ह्यांमध्ये वाढत्या शेतकरी आत्महत्यांवर शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा चिंता व्यक्त केली आहे. योजनांच्या निकषात बदल व अंमलबजावणीसाठी सुधारणा करण्यात यावी, असे आग्रही प्रतिपादन पंतप्रधानांना पत्राद्वारे करण्यात आले आहे.

राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांत जलयुक्त शिवार, कृषिपंपाला वीजपुरवठा, जल नियोजन, जैव संशाधने, कृषी पतपुरवठा, कृषी विमा यांसह राष्ट्रीय योजना व उपक्रम विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राबविले आहेत. मात्र, याचा लाभ खºया व गरजू शेतकºयांना मिळत नसल्याची खंत मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. सिंचन, वीजपुरवठा, ग्रामीण रोजगार, शेतमालास योग्य आधारभूत किंमत यांसह कृषी पतपुरवठा या क्षेत्रात संस्थात्मक व गुणात्मक नियोजन झालेले नाही. शेतमालास उत्पादन खर्चासह आधारभूत किंमत मिळत नाही व त्यांचे आर्थिक शोषण रोखण्यासाठी कृतीऐवजी प्रयत्न केले जात असल्याचे भासवले जाते. यामधून दलालांचेच पोषण होऊन शेतकºयांची लूट होत असल्याची खंत तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून व्यक्त केली आहे.यावर्षी राज्य शासनाने थकबाकीदार शेतक-यांचे कर्ज माफ केले असले तरी  नाबार्डची कर्जवितरण प्रणाली, व्यापारी बँकांसह जिल्हा बँकांची कृषी पतपुरवठ्याबाबत उदासीनता यामुळेच शेतक-यांना वेळेवर पतपुरवठा होत नाही. त्यामुळे कर्जमाफीचा उद्देश साध्य होऊ शकणार नाही, अशी भीती तिवारी यांनी व्यक्त केली. केंद्र शासनाने स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पावले उचललीत. २०२० पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. सुधारित बियाणे, मृदा आरोग्य कार्ड, शेतीविषयक सुधारणा, सुधारित विमा, सिंचनक्षेत्रात वाढ करणे, ई-बाजार व्यवस्था आदी कार्यक्रम राबविण्यात येत असले तरी यासाठी कृषी मंत्रालयाची जबाबदारी निश्चित करावी व शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर या उपाययोजनांवर नव्याने विचार व्हावा, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली.

यामध्ये सुधारणा, विस्तार आवश्यकशेतक-यांवर ओढवणा-या संकटांमध्ये भूमी सुधार, अल्प व कोरडवाहू शेतक-यांची संख्या, पाणी व भूमी गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा वापर, पतपुरवठा संस्थांचे  कर्जवाटपाचे नियोजन, शेतक-यांना लाभदायक पीकपद्धती, शोषनविरहित विपणन व्यवस्था यांसह कृषिमूल्य आयोगाचा विास्रा आवश्यक आहे. कृषी विषयाच्या समवर्ती सूचीमध्ये  राज्यांच्या धोरणात्मक अधिकारात वाढ, सुधार व विस्तार यावषयी गंभीरपणे विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारा केली.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती