म्हणे नवा प्रस्ताव पाठवू : आमदारांची उपोषण मंडपी भेट
वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी येथील जुने बस डेपो परिसरातील स्मशानभूमी ते नेहरू चौक या रस्त्याचे लांबीकरण व रुंदीकरण करण्याबाबत आंदोलनाचा इशारा देत, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने ११ फेब्रुवारीपासून उपोषण आरंभले होते. १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग विभाग, अकोला येथील कनिष्ठ अभियंता प्रशांत पाटील यांच्या आश्वासनानंतर उपोषणाची सांगता झाली.
दरम्यान, शनिवारी आमदार बळवंत वानखडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका०यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. परिणामी, दुपारी ५ वाजताच्या सुमारास अकोला कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजावून घेतल्या. संबंधित मार्ग हा सध्याच्या अंजनगाव ते आकोट मार्गाच्या प्रस्तावित कामात समाविष्ट नसल्याने या मार्गाबाबत नवीन प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरी मिळवू. लवकरच या मार्गाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे पत्र उपोषणकर्त्यांंना देण्यात आले. त्यानंतर उपोषणकर्ते विपुल नाथे, विदर्भकुमार बोबडे, शिवदास यावले, परमेश्वर श्रीवास्तव यांना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद दाळू , कनिष्ठ अभियंता प्रशांत पाटील यांनी फळाचा रस पाजून उपोषण सोडले. यावेळी नियाज कुरेशी, सुधाकर खारोडे, अरुण चौखंडे, विपुल बाळे, सागर खानापुरे, बापूराव बाळापुरे, प्रदीप अडगोकार, रवींद्र नाथे, गजानन पाठे उपस्थित होते.