बडनेरा : जिल्हा सामान्य रुग्णालय व बडनेरा स्थित लक्ष्मणराव उमक मेमोरियल नर्सिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तमसरा येथे सिकलसेल आजारावर पथनाट्य सादर करण्यात आले.
सिकलसेल आजारावर कायम औषधोपचार उपलब्ध नाही. त्यामुळे नियंत्रण हाच एकमेव पर्याय आहे. याबाबत जनजागृतीसाठी मनोज पाटील लिखित सिकलसेल आजारावरील पथनाट्य गावात सादर करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम तसेच डॉ. निरवणे, डॉ. विलास जाधव, डॉ. नरवडे, डॉ. वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाजागरण अभियान राबविण्यात येत आहे. जिल्हा सिकलसेल समन्वयक गोकुळ ठाकूर, अतुल होले, मनोज पाटील, मेघा चर्जन तसेच लक्ष्मणराव उमक मेमोरियल नर्सिंग हॉस्पिटलमधील सारिका देशमुख, ज्योती बनसोड, स्वाती वानखडे, उत्तमसरा येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या डॉ. सोनाली देशमुख, आकाश हिंगलासपुरे, मंगला वानखडे, सविता शिंदे, संगीता निंभोरकर, सुरेखा सवाई, सरपंच धर्मेश मेहरे, उपसरपंच मानकर यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.