अचलपुरात पडसाद, रिपब्लिकन एकता मंच आक्रमक
परतवाडा : चंद्रपूर जिल्ह्यात भानामतीच्या संशयावरून दलित महिला-वृद्धांना बांधून मारहाण करणाऱ्या दोषींवर तत्काळ कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा रिपब्लिकन एकता मंचच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना सोमवारी निवेदनातून दिला.
रिपब्लिकन एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रताप अभ्यंकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. घटनेला तीन दिवस उलटूनसुद्धा अद्याप कठोर कारवाई करण्यात आली नाही किंवा झालेली कारवाई अजूनपर्यंत पुढे आलेली नाही. त्यामुळे प्रशासन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप रिपब्लिकन एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रताप अभ्यंकर यांनी केला आहे. याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला. निवेदन देताना प्रताप अभ्यंकर सचिन शेजव राहुल गवई, प्रमोद तानोडकर, वैभव वानखडे, मनीष वानखडे, सागर वानखडे, हितेश वानखडे, नितीन शेजव, सत्यविजय इंगळे, भारत हिवराळे, सुनील सरदार, प्रफुल्ल सरदार, गजानन गवई अमरदीप रायबोले, प्रमोद दाभाडे गौतम सरदारसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कोट
पुरोगामी महाराष्ट्रात आजही दलितांवर अत्याचार होत असल्याची घटना घडत आहे. अशाच संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येईल.
- प्रताप अभ्यंकर, संस्थापक अध्यक्ष, रिपब्लिकन एकता मंच, अचलपूर