अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या बसची दुरावस्था पाहता प्रवाशांचे अक्षरश: बेहाल होत आहे. ही व्यवस्था सुधारण्याकरिता प्रहार संघटनेने लढा उभारला असून याकरिता बुधवारी वलगाव येथील पेढीनदीवर पंर झालेल्या एसटीमध्येच ठिय्या मांडून एसटी महामंडळाला वेठीस धरले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व सोईसुविधा पुरविण्याचे आश्वासन महामंडळाने प्रहार कार्यकर्त्याना दिल्यावरच आंदोलन मागे घेण्यात आले. राज्य परिवहन महामंडळात एसटी वाहनाची दुरवस्था पाहता अनेक अडचणीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. एसटीची अवस्था बघता प्रवाशांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे. भंगार एसटीमधूनच गेल्या कित्येक दिवसांपासून महामंडळ आपली वेळ मारुन नेत प्रवाशांच्या सोईसुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भंगार अवस्थेतील काही एसटींना खिडकी अथवा काचा नाहीत. काही एसटीमध्ये खुच्र्या सुस्थितीत नाहीत. चालक, वाहकांची कमतरता असतानाही नियुक्त्या केल्या जात नाहीत, अश्या समस्यामुळे प्रवासी कटांळले आहे. परतवाडा व चादुरबाजार आगारात एसटी बसेसचा दर्जा सुधारणे, रिक्त पदे भरणे व काही मार्गावर फेर्या वाढविणे अश्या मागण्या प्रहारने केल्या होत्या. ऑगस्ट अखेरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन अमरावती : या मागणीकरिता प्रहार संघटनेने २७ मे पासून डेरा आंदोलन करण्याची भूमिका दर्शविली होती. या पार्शभुमीवर बुधवारी अांदोलनाच्या तयारीत असणार्या प्रहार कार्यकर्त्याना वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर शेगाव-बम्हपुरी ही एसटी बंद अवस्थेत दिसली. ही एसटी पंर झाली होती तसेच त्यामध्ये चाक बदलविण्यासाठी दुसरी स्टेपनी एसटीमध्ये नसल्याचे प्रहार कार्यकर्त्यांना दिसून आले. त्यामुळे प्रहार सघंटनेनेचे संस्थापक बच्चू कडू व जिल्हा प्रमुख छोटु महाराज वसु यांनी त्या बंद एसटीमध्येच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. एसटीमधील सर्व प्रवाश्याना प्रहार कार्यकर्त्यानी स्वत:च्या वाहनावर बसवून अमरावती बसस्थानकापर्यंत पोहचविण्यात आले. दुपारी १२ वाजता भर उन्हात एसटीमध्ये ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. प्रहार कार्यकर्त्यानी एसटीवर चढून घोषणाबाजी करीत प्रहारचे झेंडे फडकाविले. महामडळांच्या भोंगळ कारभारावर घोषणाबाजी करीत प्रहार कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु ठेवले होते.त्यामुळे वलगाव मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. या आंदोलनाची भनक महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या अधिकार्यांना लागताच प्रादेशिक व्यवस्थापक,प्रादेशिक अभियंता, विभाग नियंत्रक व यंत्र अभियंता यांनी आंदोलनस्थळी भेट देवून बच्चु कडु यांच्याशी चर्चा केली.यावेळी बच्चू कडू यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वि.ना. मोरे यांच्याशी मोबाईलवर संपर्क करुन आपल्या मागण्या पुर्तेतेकरिता आश्वासन मागितले. तब्बल ४ वाजेपर्यंत हे ठिय्या आंदोलन पेढीनदीच्या पुलावर सुरुच होते. यादरम्यान महामंडळाच्या अधिकार्यांनी ठिय्या आंदोलन स्थळावर भेट देवून बच्चु कडु यांच्याशी चर्चा केली. जुन महिन्यातील विधीमंडळाच्या अधिवेशनात घेण्यात येणार्या बैठकीत आपल्याशी चर्चा करण्यात येईल असे आश्वासन बच्चु क़डु यांना देण्यात आले.त्यावेळी चादुरबाजार व परतवाडा आगारातील काही समस्या सुधारण्याचे आश्वासन अधिकार्यांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात प्रहारचे धीरज जयस्वाल, मंगेश देशमुख, शंभु मालठाणे, गजानन भुगुल, जोगेंद्र मोहोड, राजेश वाटाळे, सुरेश शेंडे, भारत उगले, राजेश उगले, धर्मपाल जगराळे, चंदु खेडकर, अतुल काळे, मोहन गवई, अजु पठाण, रवी जंवजाळ,नंदु काळे, दीपक भोगांळे, अनिकेत वसु, प्रफुल नवघरे, सागर घनसांडे, सालेम शहा, बबलु माहोरे, विनोद डोळस, मनोज तसरे, भास्कर सासुतकर आदीचा सहभाग होता.