शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

धक्कादायक वास्तव : कर्जमाफीच्या वर्षपूर्तीमध्ये विदर्भात १,१९० शेतकरी आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2018 5:53 PM

शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. या वर्षभराच्या कालावधीत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात १,१९० शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले.

गजानन मोहोडअमरावती : बळीराजाचे जगणे अलीकडे निसर्र्गाच्या लहरीपणावर ठरले आहे. त्यामध्ये जिरायती शेतक-यांना काय खावे अन् काय पिकवावे हीच मुख्य समस्या ठरत आहे. शासनाने जून २०१७ मध्ये कर्जमाफी जाहीर केली. या वर्षभराच्या कालावधीत अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात १,१९० शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले. यंदा सहा महिन्यांत ४८६ शेतक-यांनी मृत्यूचा फास ओढल्याचे भीषण वास्तव आहे. 

शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात ३० जून २०१८ पावेतो १५ हजार १८७ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये ६ हजार ८०२  प्रकरणे पात्र, ८ हजार २४३ अपात्र, तर २०० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा जानेवारीत ९७, फेब्रुवारी ८३, मार्च ९६, एप्रिल ८०, मे ७३ व जून महिण्यात ५७ शेतक-यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. विभागात दरदिवशी तीन कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे. शेतकरी आत्मत्यप्रवण म्हणून ओळख असलेले अमरावती, यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात काही प्रमाणात आत्महत्या कमी झाल्या असताना बुलडाणा जिल्ह्यात मात्र शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. यंदाच्या सहा महिन्यांत १२६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली.

अपुरा पाऊस, बोंडअळीचा प्रकोप, सलग दुष्काळ, नापिकी, यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज यासह अन्य कारणांमुळे शेतक-यांना नैराश्य येत आहे. मुला-मुलींचे विवाह, शिक्षण व जगाव कसे? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतक-याला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शकपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित लाभापासून राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच असल्याने शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. 

मृत्यनंतरही शेतकरी कुटुंबाची उपेक्षाचविभागात सन २००१ पासून १५,१८७ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्यात यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त ८,२४३ प्रकरणांत शासकीय मदत नाकारण्यात आली. मृत्यूपश्चातही शासनाच्या अनास्थेने बळीराजाच्या पदरी उपेक्षाच आलेली आहे. दिड दशकातनंतरही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना फक्त एक लाखाची मदत मिळते. त्यातही ३० हजार बँक खात्यात, तर उर्वरित ७० हजार रुपये पाच वर्षांसाठी संयुक्त खात्यात ठेवी स्वरूपात राहते. त्यामुळे कुटुंबाचा कर्ता गमावल्यानंतर त्या परिवाराला विविध संकटांचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव आहे.